🌟नाविन्यपूर्ण योजनेतील लाभार्थी निवड यादीची सोडत सोमवारी....!


🌟अर्जदारांनी पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.नेमाडे यांनी केले🌟 

परभणी (दि.०३ मार्च) : नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेंतर्गत सन २०२२-२३ साठीच्या दोन दुधाळ संकरीत गाई, म्हशींचे गट वाटप, १० अधिक १ शेळी गट वाटप, एक हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपन व जिल्हास्तरीय योजना (सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेतील लाभार्थीची अंतिम निवड यादी जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत (ऑनलाईन रँडमायझेशन) याद्रच्छीक पद्धतीने सोमवारी, (दि. ६) सकाळी ११.३० वाजता काढण्यात येणार आहे. तरी या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या अर्जदारांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी.नेमाडे यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या