🌟पुर्णा तालुक्यात अन्नदात्या शेतकऱ्यावर आसमानी संकट अवकाळी पावसासह काही भागात गारपीट....!


🌟आवईसह आसपासच्या गाव शिवारात गारपीट,निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला🌟 

पुर्णा (दि.१७ मार्च) - मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात निसर्गाची अवकृपा झाल्याचे निदर्शनास येत असून या आसमानी संकटात पुर्णा तालुक्यातील अन्नदाता शेतकऱ्यांना देखील आपल्या कचाट्यात घेतल्याचे दिसत आज शुक्रवार दि.१७ मार्च २०२३ रोजी तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसासह काही भागात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह काढणीला आलेल्या पिकांचे देखील नुकसान झाल्याने निसर्गाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाचा घास निसर्गाने पळवल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.


पुर्णा तालुक्यात कालपासून सर्वत्र वातावरणातील अचानक झालेल्या बदला नंतर आज शुक्रवारी ०४-०० वाजेच्या सुमारास तालुक्यातील आवई शिवारात जोरदार गारपीट झाली.या गारपिटीने शेती पिकांसह आंबा,संत्रा,मोसंबी फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मागील दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते काल गुरुवार दि.१६ मार्च २०२३ रोजी काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला तर आज शुक्रवारी सकाळ पासूनच थंड वातावरण होते.ढगाळ वातावरणा नंतर तीन वाजण्याच्या सुमारास पूर्णा हयातनगर रस्त्यावर असलेल्या आवई शिवारात सुसाट वाऱ्यासह गारपीट झाली. काही भागात सुपारीच्या तर काही भागात बारीक स्वरूपाची गारपीट झाली.या गारपिटीने शेतातील काढणीस आलेल्या गहू,ज्वारी पिकांसह आंबा,चिकू,मोसंबी, संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे पूर्णा शहर परिसरात याच सुमारास मोठा पाऊस झाला.अवकाळी पावसामुळे नाल्या तुडुंब वाहत होत्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या