🌟पुर्णा तालुक्यातील राज्य महामार्गांची काम देखील बोगस : पुर्णा-ताडकळस राज्यमहामार्गाला अवघ्या १५ महिन्यातच गेले तडे...!

 


🌟महाराष्ट्र शासन राज्य महामार्गांची बोगस कामे करणाऱ्या कंत्राटदार कंन्यांवर कारवाई करणार काय ?🌟


पुर्णा (दि.२३ मार्च ) : नांदेड-पुर्णा-ताडकळस-सिंगनापूर-पाथरी-माजलगाव या राज्य महामार्ग क्रमांक - ६१ या राज्य महामार्गावरील परभणी जिल्ह्यातील हद्दीतल्या चुडावा-पुर्णा ते पुर्णा-ताडकळस-सिंगणापूर फाटा पर्यंतच्या कामाचे टेंडर कल्याण टोन इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड या कंपनीला देण्यात आले होते सदरील रस्त्याच्या कामावर मंडळ कार्यालय परभणी व विभागीय कार्यालयाचे नियंत्रण असते संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.पाटील यांनी कामाच्या सुरवातीलाच संबंधित गुत्तेदारावर नियंत्रण न ठेवल्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून झालेल्या या राज्य महामार्ग क्रमांक-६१ वरील पुर्णा नदीपात्रालगत असलेल्या बॉम्बे पुल परिसरात या मार्गावर अवघ्या पंधरा महिन्याच्या कालावधीत  अक्षरशः मोठमोठया तडा गेल्यामुळे या मार्गाची अल्पकालावधीतच वाट लागल्याचे दिसून येत आहे.


पुर्णा-ताडकळस-सिंगनापूर फाटा या राज्य महामार्ग क्र.६१ या महामार्ग रस्त्याचे काम डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाले असून अवघ्या पंधरा महिन्यांचा कार्यकाळ उलटल्यावर या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्याला मोठमोठे तडे पडले आहेत राज्य शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून हा राज्य महामार्ग बनवण्यात आला असतांना देखील या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले कशे ? असा प्रश्न निर्माण होत आहे या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी तडे पडले असून अपघात होण्याची भीती नाकारता येत नाही सदरील महामार्ग बनवण्यासाठी अडीच ते तीन वर्षाचा कालावधी लागूनही सदरील राज्य महामार्ग म्हणावा तितका मजबूत झाल्याचे दिसून येत नाही राज्य महामार्गावर ठिकठिकाणी तडे जात असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे एकीकडे वाहनधारकांकडून व सर्वसामान्य कडून टॅक्स च्या नावाखाली कोट्यावधी रुपये वसूल केले जातात परंतु सदरील रक्कम सत्कारणी लागत नसल्याचे दिसून येत आहे राज्य महामार्गावर मागील एक ते दीड वर्षाच्या कालावधीत मोठमोठे अपघात झाले असून या अपघातात अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.


राज्य शासन/केंद्र शासन राज्य मार्गांसह राज्य महामार्गांची काम मजबूत व उत्कृष्ट दर्जाची व्हावी याकरिता मोठमोठ्या कंपन्यांना रस्त्यांच्या कामांची कंत्राट देत असली तरी यावर नियंत्रण ठेवणारे एस.एस.पाटील यांच्या सारखे अधिकारी निकृष्ट दर्जाच्या कामांना प्रोत्साहन देऊन शासकीय विकासनिधी भ्रष्ट गुत्तेदार कंपन्यांच्या घषात घालीत आहे संबंधित कंत्राटदाराकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच वर्षाची काल मर्यादा असुनही संबंधित कंत्राटदार मात्र याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत आहे संबंधित कंत्राटदारावर मंडळ कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचेही लक्ष असणे गरजेचे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाहीत परभणी जिल्ह्यातील रस्त्याची बिकट अवस्था असतानाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्हा पुन्हा एकदा अधोगतीच्या मार्गावर जाईल की काय हा प्रश्न भेडसावत आहे कोट्यावधी रुपयाचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्यावर प्रशासनाने अंकुश ठेवणे गरजेचे आहे ? संबंधित विभागाने व वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घ्यावी व कॉलिटी कंट्रोल मार्फत या  राज्य महामार्गाची  तपासणी करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकाकडून व ग्रामस्थांकडून पुढे येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या