🌟प्रख्यात कवी ॲड.विजयकुमार कस्तुरे संभाजी महाराज साहित्य संमेलनामध्ये पुरस्काराने सन्मानित....!


🌟धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनामध्ये उत्कृष्ट साहित्य सेवेचा,राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त🌟

✍️ मोहन चौकेकर

 सातारा (दि.०१ मार्च) - जिल्ह्यातील फलटण येथील ॲग्रोन्यूज परीवार फलटण तर्फे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तथा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनामध्ये उत्कृष्ट साहित्य सेवेचा, राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त " उद्रेक " काव्यसंग्रहाचे कवी डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲड. चिखली यांना, शंभर पेक्षा जास्त पुस्तकांचे सुविख्यात लेखक जगन्नाथ शिंदे, संमेलन अध्यक्षा तथा समाज सेविका व ज्येष्ठ साहित्यिका संगीताताई जामगे, ॲग्रोन्यूज परिवाराचे संमेलन आयोजक मा. प्रकाश सास्ते, प्रा. विजय काकडे, प्रा. नितीन नाळे तथा ज्येष्ठ कविवर्य सिताराम नरके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोबत ज्येष्ठ कवी कथाकार बबनराव महामुने तथा समाज सेवक कवी अंकुश पडघान होते......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या