🌟पुर्णेत राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक सर्व कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू....!


🌟कर्मचाच्यांना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी🌟


पूर्णा (दि.१४ मार्च) :- महाराष्ट्र राज्यातील दि.०१ नोव्हेंबर २००५ व नंतर नियुक्त सर्व कर्मचाच्यांना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे या मागणीसाठी जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या वतीने बेमुदत संप तहसील कार्यालय समोर सुरू आहे


राज्य सरकारी निससूरकारी, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्पचारी संघटना समन्यय समिती महारष्ट्र " यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील दि.०१ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाच्याना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे या मागणीसाठी दि.14 मार्च रोजी पासून बेपुदत संप केल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना,सदर समन्वय समितीची घुटक संघटना असल्याने सदर बेमुदत संपात आम्ही सक्रीय सहभागी होत आहोत.शेजारील पं.बंगाल, राजस्थान, छत्तिसगढ,झारखंड, पंजाब आणि आता हिमाचल प्रदेश राज्य सरकार जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून कर्मचा्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असताना महाराष्ट्रतील राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ज्यातून राज्यातील कर्मचान्यांचा शासनावरील विश्वास उडत जाऊन शासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत  महाराष्ट्र शासन राज्यातील दि.०१ नोव्हेबर २००५ रोजी व नंतर सर्व कर्मचान्याना १९८२ व १९८४ जी जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करीत नाही तोपर्यत दि. १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप करण्याचा निर्णय सर्व कर्मचान्यानी घेतला आहे. सदर संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना,आरोग्य विभाग कृषी सहाय्यक महसूल विभाग जिल्हा परिषद अभियंता जिल्हा परिषद विस्तार अधिकारी आरोग्य कर्मचारी शिक्षण संघटना जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा परिषद कृषी तांत्रिक अधिकारी जिल्हा परिषद पशु चिकित्सालय व्यवसाय जिल्हा परिषद लेखा कर्मचारी जिल्हा परिषद औषधी निर्माता कर्मचारी महिला व बालविकास पर्यवेक्षक जिल्हा परिषद वाहक चालक महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा परिषद सर्व शिक्षक कर्मचारी शिक्षक महर्षी डॉक्टर वसंतराव देशमुख शिक्षक परिषद जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषद हाच पंप व दुरुस्ती जिल्हा परिषद कामगार अशा विविध संघटनेने सहभाग नोंदवला  व तसेच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनीही बेमुदस संपाला जाहीर पाठिंबा दिला. व जुनी पेन्शन लागू करावी यासाठी तहसीलदार मा. माधव बोथीकर यांना निवेदन देण्यात आले निवेदकावर तालुका अध्यक्ष पंढरीनाथ ठाकूर तालुका उपाध्यक्ष  प्रमोद आंबोरे तालुका सचिव आबनराव पारवे तालुका कोषाध्यक्ष अध्यक्ष श्याम खोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या