🌟पुर्णेतील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी आवश्यकता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याची...!

🌟शासकीय रुग्नालय शहरापासून 3 किमी दुर : शहरातील गोरगरीब रुग्न शासकीय आरोग्य सुविधेपासून वंचित🌟


पुर्णा (दि.०१ मार्च) - पुर्णा शहरातील लोकसंख्या सन २०११ यावर्षी झालेल्या जनगणने नुसार ३६४३३ होती या लोकसंख्येत आज सन २०२३ या वर्षात वाढ होऊन शहराची जनसंख्या जवळपास अंदाजे ४५ ते ५० हजाराच्या आसपास वाढली असल्याचा अंदाज आहे या लोकसंख्येच्या प्रमाणात यात गोरगरीब जनसामान्यांचे प्रमाण अंदाजे ३५% ते ४०% एवढे असून यात रोजमजूर/शेतमजूर किरकोळ व्यवसायिक हातावर पोट असलेल्या हमाल मापाडी आदींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून अश्या लोकांची संख्या शहरातील आण्णाभाऊ साठे नगर,कोळीवाडा,अजिज नगर,मस्तानपुरा/नवी आबादी,विजय नगर,छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील थुना नदी काठावरील नवीन वसाहत,डोबी गल्ली,भिमनगर,कुंभार गल्ली,शास्त्री नगर आदी भागांचा समावेश असून या भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासकीय ग्रामीण रुग्नालय शहरापासून तब्बल ३ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे शासकीय आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.


पुर्णा-ताडकळस राज्य महामार्गावरील शासकीय ग्रामीण रुग्नालयात उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या शहरातील नमूद वसाहतींतील गोरगरीब सर्वसामान्य रुग्नांसाठी खर्चाची बाब असल्यामूळे असंख्य गोरगरीब रुग्न तज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता आपला मोर्चा नाईलाजास्तव मेडीकल स्टोअर (औषधी दुकान) कडे वळवत असल्यामुळे अनेक रुग्नांना वेळेवर औषधोपचार मिळत नसल्यामुळे देखील आपले प्राण गमवावे लागत आहेत याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे शासकीय ग्रामीण रुग्नालयात प्रसुती (डिलेव्हरी) साठी जाणाऱ्या महिला रुग्नांसह सोबतच्या नातेवाईकांना देखील आपला जिव अक्षरशः मुठ्ठीत तिन किलोमीटरचा प्रवास करावा लागत असून यानंतर देखील वेळेवर योग्य उपचार मिळेल याची अपेक्षा नसल्यामुळे शासकीय ग्रामीण रुग्नालय शहरातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी 'असून खोळंबा नसून वळंबा' अशी अवस्था झाली असल्यामुळे शहरातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा गंभीर प्रश्न सुटावा याकरिता शहरात हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत शासकीय रुग्नालयाची तात्काळ निर्मिती व्हावी या दृष्टीने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह जिल्हा आरोग्य विभागाने पाऊल उचलावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या