🌟परभणी येथील नानलपेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीत बोलेरो पिकअप व्हॅनमधून 75 पोते तांदूळ जप्त....!


🌟दरम्यान, हा तांदूळ स्वस्त धान्य प्रणालीतील असावा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे🌟

परभणी (दि.01 मार्च) : नानलपेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीत मंगळवार दि.28 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री भरधाव वेगाने जाणार्‍या एका बोलेरो पिकअप व्हॅनमधून पोलिसांनी 75 पोते तांदूळ जप्त केला.

        पोलिस निरीक्षक समाधान चौरे, उपनिरीक्षक अजित बिरादार यांच्या नेतृत्वाखालील एक पथक गस्त घालत असतांना मदीना पाटी येथून एम.एच. 26 बी.ई. 8945 या क्रमांकाच्या वाहनातून तांदूळ जात असल्याची बाब निदर्शनास आली. पोलिसांनी ते वाहन पकडले. शैलेश गणेश शिंदे, इरफान मोहम्मद इब्राहिम या दोघा नांदेडच्या व्यक्तींना ताब्यात घेवून खाक्या दाखविला तेव्हा ते दोघे समाधानकारक उत्तरे देवू शकले नाहीत. पोलिसांनी तातडीने वाहन ताब्यात घेवून पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना कल्पना दिली.

         दरम्यान, हा तांदूळ स्वस्त धान्य प्रणालीतील असावा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या