🌟परभणी तालुक्यातील साडेगाव येथील नहाथकर कुटुंबाला 4 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द....!


🌟धनादेश आ.डॉ.राहुल पाटील,उपविभागीय अधिकारी शेवाळ,नायब तहसीलदार आनंद खळीकर यांच्या हस्ते सुपूर्द🌟 

परभणी (दि.28 मार्च) : तालुक्यातील साडेगाव येथील आपदग्रस्त नहाथकर कुटूंबियाला शासनाद्वारे देण्यात आलेला 4 लाख रुपयांचा धनादेश आमदार डॉ.राहुल पाटील,उपविभागीय अधिकारी शेवाळ, नायब तहसीलदार आनंद खळीकर यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.

           तालुक्यातील साडेगाव येथे काही दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून आबाजी केशवराव नहाथकर यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आपदग्रस्त कुटुंबाला मदत मिळावी याकरीता शासनाकडे पाठपुरावा केला होता.शासनाने या पाठपुराव्याची दखल घेत आपदग्रस्त कुटुंबाला 4 लाखांची मदत जाहीर केली. शासनाकडून देण्यात आलेला 4 लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश आ.डॉ.राहूल पाटील, उपविभागीय अधिकारी शेवाळे, नायब तहसीलदार आनंद खळीकर यांच्या हस्ते आपदग्रस्त कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.

           यावेळी भास्करराव नहाथकर, मुलगा रमेश नहाथकर, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, अरविंद काका देशमुख, माजी सरपंच गंगाधरराव मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रसादराव नाईक, उपसरपंच भास्करराव देवडे, चेअरमन सुदर्शन देवडे, ग्रामपंचायत सदस्य राजेभाऊ देवडे, विठ्ठलराव नवघरे, मा.उपसरपंच प्रल्हाद देवडे, गडगिळे, बंडु नाना बिडकर, सुरेश देवडे, विलास देवडे, विनायक देवडे, गोपिराज देवडे, उत्तमराव देवडे यांची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या