🌟राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण उद्या शुक्रवार दि.31 मार्च रोजी परभणीत....!


🌟काँग्रेसजणांनी सुरु केलेल्या जय भारत सत्याग्रहाच्या शुभारंभा निमित्ताने ते परभणीत दाखल होणार🌟

परभणी (दि.22 मार्च) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री आमदार अशोकराव चव्हाण हे उद्या शुक्रवार दि.31 मार्च 2023 रोजी परभणी दौर्‍यावर येणार आहेत.

            काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यासह मोदी सरकारने सुरु केलेल्या हुकुमशाही व गैर कारभाराच्या निषेधार्थ काँग्रेसजणांनी सुरु केलेल्या जय भारत सत्याग्रहाच्या शुभारंभा निमित्ताने ते परभणीत दाखल होणार आहेत, अशी माहिती जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिली.

   परभणी येथील हॉटेल ग्रीन पॅलेस येथे दुपारी 02-00 वाजता त्यांचे आगमन होणार असून दुपारी 03-00 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषद संपल्यानंतर वेळ राखीव व सोयीनुसार नांदेडकडे पुन्हा प्रयाण करणार आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या