🌟जिंतूरचां विकास 30 कोटी मंजूर तर 20 कोटी अजून आणणार - आ.सौ मेघना साकोरे बोर्डीकर

                                    


🌟शहरात ३० कोटींच्या कामाच्या भुमीपुजन सोहळ्यावेळी त्यानी आपले विचार व्यक्त केले🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर शहरांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व कामाचे भूमिपूजन संपन्न झाले याप्रसंगी त्यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेली विकास कामे आणि शहरासाठी देखील भरपूर प्रमाणात विविध विकास कामे मंजूर केली आहेत असे या निमित्ताने सांगितले.


मागील पाच वर्षांमध्ये रस्त्यांची झालेली वाताहात आणि दर्जाहीन कामे यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला असून यापुढील सर्वच कामे दर्जेदार होतील असा विश्वास या निमित्ताने त्यांनी सांगितला विरोधकावर सडकून टीका करत त्यांनी माझ्या बाबांनी कुणाकडूनही शेअर्स विकत न घेता स्वतःच्या हिमतीवर शेतकरी बांधवांसाठी साखर कारखान्याची उभारणी करून आज पर्यंत तब्बल 100 मेट्रिक टनाचं गाळप सुद्धा करून दाखवलं आणि हा कारखाना काही तांत्रिक बाबींमुळे केवळ आठ ते दहा दिवस बंद असताना विरोधकांनी स्वतःच्या कार्यकर्त्याला सोशल मीडिया मार्फत कारखाना कदापिही चालू होणार नाही सर्वांना सांगा असा संदेश देण्यासाठी धडपडत होता याने साधा डबलरोटीचा कारखाना देखील सुरू करून दाखवला नाही आणि हे काय सर्वसामान्य जनतेला न्याय देणार किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणार. मी तरी फेसबुक आणि सोशल मीडिया याच्यामार्फत मतदार संघासाठी निवडून आल्यापासून केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा प्रत्येक वेळी आपल्यासमोर मांडत आलेली आहे. केवळ विकासाचेच राजकारण करण्यात मला आवड असून जिंतूर शहरवासीयांच्या आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, पदाधिकारी यांच्या आशीर्वादामुळेच आज आपल्यासमोर मी आमदार म्हणून उभी असून आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही असे या निमित्ताने भाषणामध्ये सांगितले.

    आज जिंतुर शहरात ३० कोटींच्या कामाचे भुमीपुजन संपन्न झाले यामध्ये प्रामुख्याने जिंतुर येथे सा.बां.विभागाच्या अधिकारी/कर्मचारी करीता निवासस्थानाचे बांधकाम करणे-७९६.२७ लक्ष,ग्रामिण रूग्णालय जिंतुर येथील निवासस्थानाचे बांधकाम करणे-४३२.८६ लक्ष,जिंतुर येथे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे बांधकाम करणे-१७३.८८ लक्ष तर विश्रामगृहाचे विस्तारीकरण करणे-२३५.७० लक्ष फाळेगाव-सेनगाव या रस्त्याचे रूंदीकरणासह कॅांक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे-१५०० लक्ष या कामांचा समावेश आहे.

        यावेळी भाजपा तालुकाधक्ष लक्ष्मण बुधवंत,आदमाने मामा,पोलीस निरीक्षक वाघमारे, डॉ. रविकिरण चांडगे, उपअभियंता उमरेकर, शाखा अभियंता दिपक कुपटेकर, विनोद देशमुख, डॅा.विवेक थिटे, सचिन गोरे, गोपाळ रोकडे, डॅा.पंडीत दराडे, प्रदीप चौधरी, दत्ता कटारे, किशोर जाधव, संगीता जाधव, सुमन बार्शीकर, निर्मला बांडे,  अखिल भारतीय ग्राहक पंचायत  जिंतूर तालुका अध्यक्ष गुलाबराव शिंदे,भाजप प्रसिध्दी प्रमुख महाराष्ट्र राज्य प्रवासी संघटनेचे तालुकाध्क्ष सचिन रायपत्रीवार, सुनील घुगे, संदीप घुगे, विलास भंडारे,  आदी जण उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या