🌟परभणी जिल्ह्यातल्या पालम-राणी सावरगाव रस्त्याचे काम सुरू न झाल्यास 23 गावांचे ग्रामस्थ करणार आंदोलन....!


🌟पालम तहसील कार्यालया समोर बसणार उपोषणाला : जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना दिले निवेदन🌟


परभणी (दि.२५ मार्च) - परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील पालम-राणीसावरगाव  रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रोडवरील जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून  या रस्त्याची अवस्था पांदन रस्त्यात पेक्षा बिकट झाली आहे  रस्त्याचे काम करण्यासाठी या भागातील ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने उपोषणे केली परंतु या रस्त्याचा प्रश्न अद्याप मार्गाने न लागल्यामुळे या भागातील 23 गावांच्या नागरिकांनी मुलाबाळासह 17 एप्रिल पासून तहसील कार्यासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. 


पालम राणीसावरगाव राज्य महामार्ग क्रमांक २४९ हा रस्ता अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात खराब झाला असून या मार्गावर 23 गावांचा संपर्क आहे रस्त्याचे काम करण्यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी पाठपुरावा करून देखील मार्च 2023 मधील अधिवेशन होऊनही या रस्त्याचा कुठलाही उल्लेख केलेला नाही त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी 23 गावचे ग्रामस्थ एकवटले असून रस्त्याचे काम तातडीने मंजूर करून सुरू करावे अन्यथा 23 एप्रिल पासून उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले असून या निवेदनावर 23 गावांच्या सरपंचांनी ठराव घेऊन सह्या केल्या आहेत यात सिरसम चे सरपंच माजी उपसभापती भगवानराव पाटील, बंडू हाके ,अमोल खंडागळे, विशाल दादेवाड, कष्णा भोसले, व्यंकटेश गरुड ,हनुमंत मोगरे , माधव शिंदे ,सूर्यकांत माने,  सिद्धेश्वर पोले ,गजानन हाके, मदन केंद्रे, संतोष राठोड, अनिल आलापुरे, मारुती माने, दीपक कदम, बालाजी सुरनर ,सदाशिव बाजगिर, चंद्रशेखर लांडगे, साधू हाके, मंगेश घायाळ, संतोष राठोड, दीपक गुट्टे , मदन सुरनर , मारोती देशमुख, तुकाराम पाटील , चिंतामणी खंडागळे,  माधव शिंदे, उत्तम गादगे शिवाजी सुरनर , आदी गावांच्या ग्रामस्थांच्या सहया आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या