🌟परभणीत तेजस्विनी मोहत्सव-2023 चे उद्घाटन आज संपन्न....!


🌟स्वयं सहायता बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तु व मालाचे भव्य प्रदर्शन विक्री🌟

परभणी (दि.24 मार्च) - आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त व जागतीक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या वतीने नवतेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास कार्यक्रम अंतर्गत परभणी शहरातील हरी प्रसाद मंगल कार्यालयात आज तेजस्विनी मोहत्सव 2023 चे उद्घाटन करण्यात आले. तीन दिवस असलेल्या मेळाव्यात स्वयं सहायता बचत गटातील महिलानी उत्पादित केलेल्या वस्तु व मालाचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.परभणी शहरात महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची माविम मार्फत विक्रीसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि  बाजारपेठ निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. 

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती तृप्ती सांडभोर आयुक्त मनपा परभणी अमोल बळे महाव्यस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र परभणी. सुनिल हटेकर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया परभणीमा. सिद्धराम माशाळे विभागीय सहनियत्रंन व मूल्यमापन अधिकारी मराठवाडा विभाग माविम टी.जी.यादव जिल्हाग्राम विकास अधिकारी,खादी ग्राम उद्योग मंडळ परभणी डॉ.अरुणा खरवडे शास्त्रज्ञ गृह विज्ञान,कृषी विज्ञान केंद्र परभणी सु.ह.पवार व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र परभणी बालासाहेब झिंझाडे जिल्हा समन्वय अधिकारी माविम परभणी. आठ लोक संचलित साधन केंद्र चे अध्यक्ष उपस्थीत होते महिला महामंडळाच्यां अंतर्गत सध्या महिला शेती आणि बिगर शेती आधारित वस्तू निर्माण करून त्याची चांगल्या प्रकारे व्रिक्री करून सक्षम होत आहेत.महिला आत्मनिर्भर होण्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमतून FPO आणि CPO कंपनी निर्माण केल्या जाणार आहेत सध्या परभणी जिल्ह्यात 42 कोटी रुपयांचे वाटप बचत गटांना करण्यात आले असून त्याची परतफेड करण्याची 99.5 स्थिती असल्याने भविष्यात महिलाना उद्योजक होण्यासाठी मविम प्रयत्नशिल असल्याचे श्री सिद्धराम माशाळे विभागीय सहनियत्रन अधिकारी मराठवाडा विभाग  यांनी सांगितले 

24 मार्च ते 26 मार्च असे तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉलची उभारणी करण्यात आली असून  पहिल्याच दिवशी 2 हजारच्या वर महिलांनी उपस्थिती होती.विविध वस्तूंचे व मालाचे या प्रदर्शनास खऱ्या अर्थाने आकर्षण आहेत तसेच खाद्यपदार्थांचे देखील स्टॉल या प्रदर्शनामध्ये आहेत यामध्ये विविध प्रकारचे महिलांनी तयार केलेले घरगुती मसाले विविध प्रकारचे पापड लोणचे शेवया सांडगे कुरडी, लाल व काळे तिखट घाण्याचे करडी तेल विविध दुग्धजन्य पदार्थ खवा पेढा बासुंदी पनीर व तूप ज्वारी व बाजरीची भाकरी लाडू चिवडा लेमन ज्यूस विविध प्रकारच्या डाळी दुरडी झाडू रुखवताचे सामान  इत्यादी वस्तूंचे आकर्षण असल्याने परभणी शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी या मेळाव्यास भेट देण्याचे आवाहन मा. बालासाहेब झिंझाडे जिल्हा समन्वय अधिकारी माविम परभणी यांनी केले आहे.

आठ महिला उद्योजकांचा आणि नऊ महिला स्वयंसहायता बचत गटांचा उत्कृष्ट बँक लिंकेज साठी बचत गटांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आला तसेच आठ लोकसंचलीत साधन केंद्राचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करून गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सिद्धराम माशाळे विभागीय सहनियत्रन अधिकारी मराठवाडा विभाग  यांनी केले तर सूत्रसंचलन जयश्री टेहरे यांनी केले तर आभार श्रीमती निता अंभोरे यांनी मानले . 

कार्यक्रम यशस्वी होण्या करिता निता अंभोर सहा. जिल्हा  समन्वय अधिकारी माविम परभणी,शिवराज राउत लेखाआधिकारी माविम परभणी . सर्व माविम टीम  सर्व लोक संचलित साधन केंद्र चे अध्यक्ष,व्यवस्थापक,लेखापाल,सहयोगिनी crp यांनी कार्यक्रम यशस्वी करण्या करीत परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या