🌟नांदेड येथे सचखंड चषक 2023 स्पर्धा थाटात संपन्न....!


 🌟मंचीरियालचा संघ ठरला मानकरी अमरावतीला उप-विजेते पद🌟


नांदेड (दि.06 मार्च) :  रविवारी उशिरा रात्री पार पडलेल्या सचखंड चषक 2023 वॉलीबॉल स्पर्धेचे अंतिम विजेतेपद तेलंगाना येथील मंचीरियाल स्पाइकर्स संघाने जिंकले. अमरावती वॉरियर संघ उप विजेता ठरला. तर थिरीगार्ड हरियाणा संघलास तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. येथील खालसा हायस्कूल मैदानावर रणजीत स्पोर्ट्स अकैडमी नांदेड, गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड आणि गुरुद्वारा श्री लंगरसाहेब नांदेडच्या तर्फे संयुक्तरीतिया आयोजित खुल्या डे - नाईट वॉलीबॉल स्पर्धेची सांगता दि. 5 मार्च रोजी मध्यरात्रीच्या वेळी थाटात झाली अशी माहिती रणजीत स्पोर्ट्स अकैडमीचे स. इंदरजीतसिंघ सिलेदार यांनी दिली. 


मागील 4 आणि 5 मार्च रोजी पार पडलेल्या दोन दिवसीय स्पर्धेत विविध राज्यातून जवळपास 20 संघानी सहभाग घेतला होता. रविवारी रात्री मंचीरियाल स्पाइकर्स संघ आणि अमरावती वॉरीयर संघादरम्यान झाला. दीड तास चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात मंचीरियाल स्पाइकर्स ने शेवटी प्रथम विजेता होण्याचा मान पटकावला. वरील सामन्यांच्या संचलनासाठी खेमसिंघ पुजारी (पोलीस), सिमरजीतसिंघ बल, विक्रमसिंघ फौजी, रफियोद्दीन काजी, चरणजीतसिंघ संधू, सुरिंदरसिंघ उप्पल, कालूसेठ वापरानी, संदीप जाधव, विशाल रुडे, गुरप्रीतसिंघ ग्रंथी, जगदीपसिंघ चव्हाण, स्वप्नील कापुरे व वॉलीबॉल खेळाडूंनी परिश्रम घेतले. प्रमुख पाहुणे म्हणून गुरुद्वारा लंगर साहेबचे बाबा बिल्ला जी, सी. ए. चिरंजीलाल दागडिया, स. नारायण सिंघ पहलवान, महेंद्रसिंघ लांगरी इक़बाल सर व इतर प्रतिष्ठित नागरिकांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. वॉलीबॉलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. 

पारितोषिक प्रदान :  

प्रथम विजेता संघास रूपये 21, 111/- व चषक 

उप विजेता संघास रूपये 11, 111/- व चषक 

तृतीय स्थान विजेता संघास रूपये 7, 777/- व चषक 

प्रदान करण्यात आले. 

.......... 

रविंद्रसिंघ मोदी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या