🌟नांदेड येथे सचखंड चषक 2023 वॉलीबाल स्पर्धा दि.04 मार्च आणि 05 मार्च रोजी...!


🌟रात्रंदिवस होणाऱ्या या सामन्यात 25 संघांचा समावेश🌟  

नांदेड (दि.03 मार्च) : येथील रणजीत स्पोर्ट्स अकैडमी नांदेड संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीयस्तरावर सचखंड चषक 2023 वॉलीबाल स्पर्धेस दि. 4 आणि 5 मार्च रोजी सुरुवात होत आहे. या स्पर्धा गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड आणि गुरुद्वारा श्री लंगर साहेब यांच्या सहकार्याने घेण्यात येत आहेत अशी माहिती खेळाचे मुख्य संयोजक व सचिव सरदार इंदरजीतसिंघ शिलेदार यांनी येथे दिली आहे. 

रणजीत स्पोर्ट्स अकैडमी तर्फे होळी सणापूर्वी वॉलीबाल सारख्या लोकप्रिय खेळाचे सामने दरवर्षी नांदेड येथे घेण्यात येत असून स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. संस्थेचे अध्यक्ष सरदार सिमरजीतसिंघ बल, विक्रमसिंघ फौजी, खेमसिंघ पोलीसवाले, गुरबचनसिंघ पोलीस यांच्या मार्गदर्शनात होत असलेल्या स्पर्धेत यंदा पंजाब पोलीस, मुंबई, हैदराबाद, अकोला, संभाजीनगर, पुणे व इतर ठिकाणाहून जवळपास 25 संघांनी सहभाग नोंदवला आहे. खालसा हाईस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर वरील स्पर्धा होत असून येथे डे - नाईट सामने रंगणार आहेत. खेळाडूं व पांचांची राहण्याची व खाण्याची सोय रणजीत स्पोर्ट्स अकैडमी नांदेड तर्फे करण्यात आली आहे. 

स. इन्दरजीतसिंघ सिलेदार यांनी सांगितले की, दि. 4 रोजी सायंकाळी 4 वाजता संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार शरणसिंघ सोढी, सहायक अधीक्षक स. ठानसिंघ बुंगाई व इतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्याकरीता चरणजीतसिंघ संधू, रफियोद्दीन काजी, गुरप्रीतसिंघ ग्रंथी, सुरिंदरसिंघ उप्पल, कालूसेठ वापरानी, संदीप जाधव, जगदीपसिंघ चव्हाण, स्वप्निल कापुरे, विशाल रुडे यांचे सहकार्य लाभत आहे. वरील स्पर्धेत प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती संयोजक मंडळाने केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या