🌟अनुराधा इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावली १ सुवर्ण,2 रजत, 2 कांस्य पदके...!


🌟त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे🌟

✍️ मोहन चौकेकर 

चिखली: महाराष्ट्र युवा खेळ परिषद आयोजित नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे १८, १९ व २० फेब्रुवारी २०२३ ला घेतलेल्या क्रिकेट व फुटबॉल स्पर्धेत चिखली शहरातील अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण पदक,२ रजत पदक ,२ कांस्य पदक  मिळवून या पदकावर नाव कोरुन राज्यस्तरावर अनुराधा इंग्लिश मीडियम स्कुलचे नाव उंचावले आहे.

अनुराधाच्या तन्मय सरोदे हयाने ‘क्रिकेट महाराष्ट्र टिमचा कॅप्टन म्हणून जिल्ह्याचे आणि अनुराधा शाळेचे नाव मोठे केले. तन्मय सरोदेला सुवर्ण पदक तर भुषण म्हस्केला रजत पदक, जुनेद मोहम्मदला रजत पदक, शंतनु दळवीला कांस्य पदक व विजयराज निळेला कांस्य पदक मिळाले आहेत.

त्यांच्या उत्कृष्ट खेळाची नोंद घेऊन शाळेच्या प्राचार्य जया नन्हई व व्यवस्थापिका सुजाता कुल्ली यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे व क्रिडा प्रशिक्षक  फईम सौदागर व गणेश पेरे यांचे अभिनंदन केले तसेच शाळा समितीच्या अध्यक्षा व संस्थेच्या सचिव अँड वृषालीताई बोंद्रे व संस्थेचे अध्यक्ष क्रिडा क्षेत्रात विशेष रुची ठेवणारे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त केल्यामुळे विद्यार्थ्यांचे, शाळा समितीचे, क्रिडा प्रशिक्षक तसेच शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या