🌟मुंबईतील आझाद मैदानावर कंत्राटी आरोग्य सेविका/आरोग्य सहायिकांचे दि.13 मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन....!


🌟राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे सपसेल दुर्लक्ष🌟  


मुंबई :- आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते नर्सेस युनियन यांचे मुंबई आझाद मैदानावर कंत्राटी आरोग्य सेविका आणि आरोग्य सहायिका यांचे बेमुदत धरणे आंदोलन 13 मार्चपासून सुरू होते, आणि आरोग्य मंत्री साहेबांनी पहिल्याच दिवशी शिष्टमंडळ बोलावून बैठकीचे पत्र काढायला सांगितले ,16 मार्च ला बैठक होणार होती परंतु ती अचानक रद्द करण्यात आली आणि पुढील तारीखही दिली नाही त्यामुळे सर्व आरोग्य सेविका ह्या आक्रमक झाल्या आणि 7ते 8जणांना तब्येत बिघडल्यामुळे अचानक चक्कर आल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले, 16 मार्चला बैठक रद्द झाल्यानंतरही मुंबई आझाद मैदानावर सर्व आरोग्य सेविका तटून तिथेच ठामपने राहिल्या, अभी मध्येही आमचे विषय हे आमदारांनी खासदारांनी मांडले,त्यामुळे नंतर परत आरोग्य मंत्री साहेबांनी शिष्टमंडळ बोलण्यासाठी पाठविले परंतु त्यांनी बोलावून भेट दिली नाही ,सकाळी बारा वाजल्यापासून आमची शिष्टमंडळ हे वाट बघत होते परंतु रात्रीचे सहा वाजले तरीही भेट झाली नाही त्यामुळे आजार मुंबई आझाद मैदानावरील सर्व आरोग्य सेविका विधान भवना समोर जाऊन आक्रमक झाल्या, आणि मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आमच्या शिष्टमंडळांनी एवढे प्रकरण झाल्यानंतर आरोग्य मंत्री साहेबांची भेट झाली आणि आता सोमवारी 20 मार्चला बैठक घेऊ म्हणून परत आश्वासन दिले , आणि सर्व आरोग्य सेविकांना पोलिसांनी त्यांच्या गाडीमध्ये बसवून दमदाटी करून मुंबई आझाद मैदानावर नेऊन सोडले.परतू नंतर  पोलिसांनीही आम्हाला सहकार्य केले. म्हणून पोलिसांची ही आम्ही आभार मानतो.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या