🌟पुर्णेत लोकजनजागृती सेवाभावी संस्थेच्या वतीने दि.13 मार्च रोजी बौद्ध वधु-वर,पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन....!


🌟या मेळाव्याचे उदघाटन भदंत डाॅ.उपगूप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात येणार आहे🌟

पूर्णा (दि.१० मार्च) - लोकजनजागृती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नांदेड अंतर्गत द बुद्धिस्ट साउली वधू- वर सुचक केंद्र व्दारा  एकबाल नगर, टि पाॅईट पूर्णा ता.पूर्णा जि.परभणी येथे दिनांक 13 मार्च 2023 रोजी बौद्ध वधु-वर,पालक  परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्याचे उदघाटन भदंत डाॅ. उपगूप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. केशव जोधंळे राहणार आहेत तसेच या कार्यक्रमात मराठवाड्यातील राजकीय, सामाजिक, साहित्यिक व विधी क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित राहणार आहेत तर स्वागताध्यक्ष अनुसुचित जाती विभागा राष्ट्रीय काॅग्रेस, परभणी  जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे राहणार असल्याची  माहिती संस्थेचे राज्य समन्वयक राहुल पुंडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

         सविस्तर वृत्त असे की, दिनांक 13 मार्च 2023 वार सोमवार रोजी लोकजनजागृती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नांदेड अंतर्गत एकबाल नगर, पूर्णा येथे विभागीय बौद्ध वधु-वर,पालक  परिचय महामेळाव्याचे आयोजन संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक राहुलभाऊ पूंडगे यांनी केले आहे.या मेळाव्याचे उदघाटन पूज्यणीय भदंत डाॅ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. केशव जोंधळे राहणार आहेत.तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून प्रकाशदादा कांबळे  (रि.पा. ई नेते, पूर्णा), शंकरकाका पूंडगे ( माजी नगराध्यक्ष, पूर्णा), दिलिप  हानमंते (माजी नगराध्यक्ष, पूर्णा),दादाराव पंडीत  (नगरसेवक पूर्णा), अनिल पंडीत,सुनिल गायकवाड, अनिल पंडित   प्रदिपभाऊ वावळे, प्रा.चिंतामन खंडागळे, संजय सारणीकर, देविदास वाघमारे, धीरज कांबळे, लक्ष्मण गायकवाड  (मराठवाड्यातील समाज सेवक) ,  राजकुमार सुर्यवंशी  ( रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष, परभणी), श्रीकांत हिवाळे ( तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, पूर्णा) , त्र्यंबक कांबळे  ( शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा), अतुल गवळी, उमेश बारहाटी,  (भारतीय बौद्ध महासभा, पूर्णा), श्रीधर आडेकर ( जिल्हाध्यक्ष दलित सेना, परभणी ), राहुल उभारे  (माजी नगरसेवक, वसमत), किरण जाधव (मुख्य टिकिट निरिक्षक, नांदेड), गंगाधर बेलुरकर  (उद्योजक, नांदेड),विलासदादा वाघमारे  (जिल्हाध्यक्ष लोकजनशक्ती पार्टी, नांदेड) , वि.रा.लोणे गुरूजी ( कवि तथा साहित्यिक, नांदेड)  तसेच विधी सल्लागार म्हणून अॅड.सिध्दार्थ खरे, अॅड.हिरानंद गायकवाड,अॅड.शैलेश पुंडगे, अॅड.सिध्दार्थ गायकवाड , अॅड श्रीनाथ टेकाळे, अॅड.संघरत्न कु-हे, नितिन चौंडिकर, अॅड. शुध्दोधन.अॅड. येशोनील मोगले हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती पुंडगे यांनी दिली.

      संयोजन समिती व सुचक समिती चे मिलिंद मुळे, सुंदर जानराव, गंगाधर दामोधर, अशोक हानवते, मनोज हाटकर, सौ.हेमाताई कांबळे, आशा पाटिल, ललिता गंगातीर, महानंदा सुर्यवंशी, अर्चना जानराव,सूषमा वाकडे, शामसुंदर काळे, चंद्रमुणी लोखंडे,सुनिल मगरे, चंद्रकांत उगले, रवी रावन वाघमारे,  कुंदन ठाकुर सह संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार सितळे आयोजक राहूलभाऊ पुंडगे यांनी या मेळाव्याचा लाभ बौद्ध समाज बांधवांनी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच नोंदणी करिता 7620761999 या मोबाईल वर संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धिपत्रकान्वये केले आहे.....

          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या