🌟परभणी येथील उदयलक्ष्मी ट्रस्टतर्फे 07 मे 2023 रोजी सामुहिक विवाह सोहळा....!


🌟शहरातील जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर सर्वधर्मिय सामूहीक विवाह सोहळ्याचे आयोजन🌟

परभणी (दि.15 मार्च) : येथील उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 07 मे 2023 रोजी जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर सर्वधर्मिय सामूहीक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष भिमराव वायवळ यांनी दिली.


                    या विवाह सोहळ्यात उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वधू-वरांना शुभ्रवस्त्र, वर्‍हाडींना भोजन, मंडप व मंगल परिणय विधीची सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागा अंतर्गत कन्यादान योजनेतून 20 हजार रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे. 18 वर्ष पूर्ण केलेल्या मुलींचे व 21 वर्ष पूर्ण केलेल्या मुलांचा जन्म दाखला वधू-वरांना अनिवार्य आहे.

                     दरम्यान, या सोहळ्याकरीता अक्षय परसोडे, मधुसूदन जोशी, नामदेव खंदारे, प्रतिक खिल्लारे, संदीप भुकनर, ब्रह्मानंद नाईक, रावसाहेब धरणे, भानुदास चापके, करीम भाई, वाजेद भाई, बालाजी नागेश्‍वर, संतोष भारती, गणेश धोत्रे, संतोष डाके, आनंद धनले, चिन्मय सरोदे आदी प्रयत्न करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या