🌟पुर्णेत शनिवार दि.04 मार्च रोजी हजरतं मस्तान शहावली उर्सा निमित्त रंगणार नामवंत शायर,कविचा मुशायारा कार्यक्रम...!


🌟या मुशायरा कार्यक्रमाचे पाथरी येथील युवा नेते सईद खान व मा.उपनगराध्यक्ष हाजी कुरेशी यांच्या वतीने आयोजन🌟

पुर्णा (दि.02 मार्च) - पुर्णेतील ग्राम दैवत म्हणून ओळखल्या हजरतं मस्तान शहावली यांच्या सार्वजनिक उर्सा निमित्त शनिवार 04 मार्च 2023 रोजी भव्य मुशायरा (कवी संमेलन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात नामवंत कवी तथा ,शायराना आमंत्रित करण्यात आले आहे या मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पाथरी येथील युवा नेते सईद खान तथा माजी उपनगराध्यक्ष हाजी कुरेशी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.


पूर्णा शहरात हजरत मस्तान शाह वली सार्वजनिक उर्स सुरू आहे या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे येत्या चार मार्च शनिवार रोजी रात्री आठ वाजता जामा मस्जीदी समोर मुशायरा (हास्य कविसंमेलन) होणार आहे या मध्ये नामवंत कवी,शायर अब्रारार कासीफ  निजामत,जोहर कानपूरीं,हाशीम  फेरोजाबादी, अल्ताफ जिया,नयूम फराज,टीपीकल जगत्याली,मनोज मद्रासी,आकींफ शुजा,चांदणी शबनम,सोहेल  आझाद,रमेश गिरी,शायर साबेर भाई,वाजीद मीर्जा सह आदी प्रसिद्ध कवी तथा शायर येणार आहे तर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी येथील शिवसेनाचे युवा नेते सईद खान,पूर्णा नगरीचे माजी उपनगरध्यक्ष हाजी कुरेशी,मा ख सुरेश जाधव,जिल्हा प्रमुख विशाल कदम,संतोष एकलारे, वसमत चे माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज,जिल्हाध्यक्ष माधव कदम,भाजपाचे हनुमान अग्रवाल,रवीभैय्या जैस्वाल, विशाल किरडे,उर्स कमेटी अध्यक्ष मुजीब पठाण,माजी नगरसेवक मगदूम कुरेशी, अखिल काजी,बाबा पठाण,इलियास चाऊस प्रकाश काबळे ,सोहल पठाण,शामसूंदर  गायकवाड, नागेश एगडे, हिरा गवली, संजय शिंदे, उत्तम आहिरे,चंद्रकांत मोरें, शेख इलियस शेख इस्राईल,स मतीन, हशमी, मुजमिल खान पाशा खान,आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहे त्यामुळे या कार्यक्रमास जास्ती जास्त नागरिकानी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावे असे आव्हान या मुशायरा कार्यक्रमाचे संयोजक जम्मू भाई ,वाजीद कुरेशी आदींनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या