💥प्राध्यापिका सौ.उज्वलाताई अनिल कांबळे (साळवे) यांना पीएचडी प्रदान.....!


💥प्रा.डॉ.सौ.उज्वलाताई कांबळे यांचे सर्वस्तरातून होत आहे अभीनंदन💥


शिक्षणशास्त्र विभाग अंतर्गत औरंगाबाद शहरातील विद्यार्थ्यांचा बाल गुन्हेगारीकडे प्रवृत्त होण्याच्या कारणांचा शोध व उपाययोजना एक अभ्यास या विषयात प्राध्यापिका उज्वला अनिल कांबळे (साळवे) यांनी वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय जालना येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर धनंजय वडमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली आहे उज्वला कांबळे या कांबळे परिवारातील शिक्षण शास्त्र विभागात चौथ्या डॉक्टर होय या अगोदर कांबळे परिवारात डॉक्टर दयानंद कांबळे ,डॉक्टर अरविंद कांबळे ,डॉक्टर राहुल कांबळे तर आता डॉक्टर उज्वला कांबळे ह्या चौथ्या डॉक्टर ठरल्या आहेत पूर्णा येथील समाजसेवक तथा श्री.स.भु.रांजणी येथील क्रीडा शिक्षक मास्टर अनिल कांबळे यांच्या त्या पत्नी आहेत 13 फेब्रुवारी रोजी यांचा वायवा पूर्ण झाला .या वायवा मध्ये बहिस्थ परीक्षक म्हणून कर्मयोगी बाबासाहेब आपोटीकर अध्यापक आणि अनुसंधान कॉलेज अकोला  येथील प्रा डॉक्टर नितीन वाटोरे  यांनी काम पाहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे शिक्षण शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत पगारे हे उपस्थित होते प्राध्यापिका उज्वला अनिल कांबळे (साळवे) या सध्याला भीमाशंकर पाडळकर कनिष्ठ महाविद्यालय गेवराई तांडा औरंगाबाद येथे इतिहास व मानसशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत .त्यांनी पीएचडी धारण केल्याबद्दल त्यांचे महात्मा बसवेश्वर संस्थेचे अध्यक्ष अनिल पाडळकर ,स भु  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर दयानंद कांबळे, आमदार डॉक्टर राहुल पाटील ,धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंत भैय्या पाटील ,आमदार संजय शिरसाट ,भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो ,माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे, परभणीचे खासदार डॉक्टर संजय जाधव,श्री. स .भु .राणीचे प्राचार्य विश्वरूप निकुंभ पत्रकार जगदीश जोगदंड डॉक्टर भुताळे नरेंद्र सिंग बिंद्रा अरविंदर कौर बिंद्रा आदींनी अभिनंदन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या