💥पोलीस अधीक्षक कार्यालयात आरोग्य शिबिर संपन्न ; १५० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घेतला लाभ...!


💥आरोग्य शिबिरामध्ये वाशिम जिल्ह्यातील अनुभवी तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ.निशाद उज्वल टिकाईत यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 



फुलचंद भगत

वाशिम:- पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदरुस्तीसाठी वाशिम जिल्हा पोलीस दल मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवनविन उपक्रमांचे आयोजन करत असते तसेच कल्याण शाखेमार्फत अनेक कार्यशाळा व शिबिरांचे आयोजन करून त्याचा लाभ पोलीस अधिकारी व अंमलदारांना मिळवून दिला जातो.


     याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे दि.२७.०१.२०२३ रोजी पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या संकल्पनेतून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य शिबिरामध्ये वाशिम जिल्ह्यातील अनुभवी व तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ.निशाद उज्वल टिकाईत, मधुमेह व रक्तदाब तज्ञ, डॉ.सोनाली निशाद टिकाईत, कान-नाक-घसा तज्ञ व डॉ.चंदनवाणी, नेत्र तज्ञ यांनी उपस्थित राहून पोलीस अधिकारी व अंमलदारांची आरोग्य तपासणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथील १५० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन लिपिक वर्ग यांनी सदर आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

     सदर आरोग्य तपासणी शिबिर मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (गृह) पो.नि.सुनील जाधव व कल्याण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेऊन पार पाडले......

 प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या