💥वाशिम नगर परिषद कार्यालयात काच फोडुन शाासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.....!


💥पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-दि. १४.०२.२०२३ रोजी फिर्यादी अमोल अशोक कुमावत, लेखाधिकारी नगरपरिषद वाशीम यांनी पो.स्टे. ला रिपोर्ट दिला की, दि. २८.१२.२०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतिने पाटणी चौक वाशीम येथे पार्कंग संदर्भाने मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते, त्यावर नगर पालीके कडुन काहीएक कार्यवाही न झाल्याने दि. १३.०२.२०२३ रोजी दुपारी ०४.४५ ते ०५.०० वा. चे दरम्यान आरोपी उमेश सुधाकर टोलमारे व तुषार सुभाष पटटेबहादुर रा वाशिम हातात लाकडी दांडा घेवुन रोखपाल कार्यालयाच्या काचेवर लाकडी दांडयाने जोरात प्रहार करून काचा फोडल्या व सरकारी मालमत्तेचे नुकसान केले, व दहशत निर्माण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशा फिर्याद वरून मनसे चे कार्यकर्ते उमेश टोलमारे, महाराष्ट्र नव निर्माण सेना वाहतुक शहर अध्यक्ष व तुषार सुभाष पट्टेबहादुर यांचेवर अप.नं. ८७ / २०२३ कलम ३५३,४२७ भादंवि सह कलम ७ फौजदारी सुधारणा कायदा, कलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने त्यांना २४ तासाचे आंत अटक करण्यात आलेली आहे. मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनाखाली वाशीम शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

यातील अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असमा त्यांचा न्यायालयाने दिनांक १७/०२/२३ पावेतो असा दोन दिवसांचा पी. सी. आर दिला आहे कोणीही अशा प्रकारचे गैरकृत्य केल्यास त्यांचे विरूध्द कठोर कार्यवाही वाशिम पोलीस कडुन करण्यात येणार आहे.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या