💥परभणी जिल्ह्यातील लघु उद्योगांनी जिल्हा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत....!


💥पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत💥

परभणी (दि.16 फेब्रुवारी) : राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योगांना प्रथम व द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात येते.  त्यानुसार सन २०२०-२१ व २०२१-२२ वर्षांच्या जिल्हा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. 

प्रथम पारितोषिक १५ हजार व व्दितीय १० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उद्योग घटकाची जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडे स्थायी लघु उद्योग म्हणून तीन वर्षांपूर्वी नोंदणी झालेली असावी व उद्योग घटक मागील दोन वर्षापासून उत्पादनात असणे आवश्यक आहे. उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. यापूर्वी राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळालेले नाहीत असेच उद्योग घटक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरतील, या महत्त्वपूर्ण अटींची पूर्तता करणा-या पात्र लघु उद्योग घटकांनी अर्ज करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, परभणी यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा उद्योग केंद्र, कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या