💥महाराष्ट्र राजापूर येथील पत्रकार शशिकांतला न्याय देणारंय का ?


💥राष्ट्रीय पातळीवरील चॅनल्सनं तर या घटनेकडे जवळपास दुर्लक्षच केले💥

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाली.. रिफायनरीला विरोध करणारी भूमिका घेऊन त्यांनी सातत्यानं लेखन केल्यानं ही हत्या झाली.. मात्र या हत्येचे जेवढे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटायला हवे होते तसे ते उमटले नाहीत..दिवंगत शशिकांतच्या बाजुने उभे राहणे म्हणजे थेट सरकार विरोधी भूमिका घेण्यासारखे आहे असा अनेकांनी ग्रह करून घेत या घटनेकडे दुर्लक्ष केले..सामाजिक संघटनांचं या विषयावरचं मौन देखील कोड्यात टाकणारं आहे.. 


माध्यमांनी देखील बातम्या देताना हातचं राखून आणि घाबरत घाबरतच बातम्या दिल्या...राष्ट्रीय पातळीवरील चॅनल्सनं तर या घटनेकडे जवळपास दुर्लक्षच केले... या पार्श्‍वभूमीवर "लोकशाही" चॅनलनं  आज सविस्तर वार्तांकन तर केलेच त्याच बरोबर एक तासाचा शो देखील केला.. सर्वसंबंधीतांच्या प्रतिक्रिया घेऊन विषयाचं गांभीर्य जनतेच्या नजरेस आणून दिलं.. त्याबद्दल लोकशाही आणि त्याचे संपादक कमलेश सुतार यांचे मनापासून आभार... 

काही पत्रकार संघटनांना या हत्त्यायाकांडाचा निषेध करण्याचीही गरज वाटली नाही किंवा हिंमत झाली नाही.. हे द:खद आहे..खरं तर आपले राजकीय हितसंबंध बाजुला ठेऊन अशा वेळी सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येणं अपेक्षित होतं.. मात्र तसं झालं नाही.. मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती  या प्रश्नावर आक्रमक असून परिषदेच्या उद्या होणारया ऑनलाईन बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या