🌟पुर्णेचे भुमिपुत्र युसूफ खान पठाण यांची सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पदावर निवड...!


🌟पुर्णेकर मित्र परिवाराने पदोन्नती मिळाल्याबद्दल श्री पठाण यांचा केला जंगी सत्कार🌟


पुर्णा (दि.२३ फेब्रुवारी) - पुर्णेतील भुमिपुत्र व परभणी जिल्हा पोलिस दलात जिल्ह्यातील गंगाखेड पोलिस स्थानकात कर्तव्य बजावत असेलेले कर्तव्यदक्ष कर्मचारी युसूफ खान पठाण यांची नुकतीच सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पदावर निवड झाली त्यांच्या निवडी बद्दल काल बुधवार दि.२२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं.०७-०० वाजेच्या सुमारास मुळगावी पुर्णेतील रेल्वे परिसरातील रेल्वे कम्युनिटी हॉल येथे पूर्णा स्टार बास्केटबॉल क्लब/दक्षिण मध्य रेल्वे मजदुर युनियन व मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या जंगी सत्काराचे आयोज करण्यात आले होते.


या सत्कार सोहळ्यावेळी रेल्वे इस्टीट्यूटचे सेक्रेटरी कांचन ठाकूर,मा.उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब,मा.नगरसेवक अखील अहेमद,मो.निसार,लतीफ उर्फ ताज मामा,यशवंत वाघमारे,,हर्षवर्धन बागूल,गौतम काले,मनोज जोंधळे,सय्यद रहीम,शाम गायकवाड,निखील गवली,शेख अमीर,मो.शफीक आदींची उपस्थिती होती....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या