💥पुर्णेतील हरिनगर येथील प्रकाश शंकरराव जाधव यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन....!


💥प्राध्यापक डॉ.महेश जाधव यांचे ते वडील तर मा.नगरसेवक सुनिल जाधव यांचे ते काका होते💥

पुर्णा (दि.१० फेब्रुवारी) - पुर्णेतील हरिनगर परिसरातील जेष्ठ नागरिक प्रकाश शंकरराव जाधव यांचे आज शुक्रवार दि.१० फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास नांदेड येथे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

 अत्यंत मनमिळावू व प्रेमळ स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणून स्व.प्रकाश जाधव यांची पुर्णा तालुक्यात ओळख होती ते लातूर येथे कार्यरत प्रा.डॉ.महेश जाधव यांचे वडील तर पुर्णा नगर परिषदेचे मा.नगरसेवक सुनिल जाधव यांचे काका होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुल प्रा.डॉ.महेश जाधव व उमेश जाधव दोन मुली नातवंड भाऊ भावजई पुतने असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दि.११ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास पुर्णा नदी काठावरील हिंदु स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांची अंत्ययात्रा हरिनगर पुर्णा येथून निघणार आहे.....

🙏🏻त्यांच्या मृत आत्यास इश्वर शांती देवो व जाधव कुटुबास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हिच इश्वरा चरणी प्रार्थना....💐


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या