💥स्व.रावसाहेब जामकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनुजा,शुभम, प्रथमेश,कुणाल,रोहण विजयी.....!


💥लोकजीवनात स्वआचरणातून प्रवाही करावे,असे आवाहन समारोपात प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांनी केले - वसंतराव भोसले

     राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य समाजासाठी सर्वसमावेशक विकासाचा मूलमंत्र होय.व्यक्ती सह समाजाच्या विधायक वाटचालीत त्यांच्या विचारांचे महत्वपूर्ण योगदान राहीले आहे.स्ञी शिक्षणा बरोबरच,बहुजन,वंचित, समाज घटकाला ही  सहज शिक्षण घेता याव या साठी गुणवत्ता पूर्ण दर्जेदार सक्तीचे मोफत शिक्षण सुरू केले. वर्तमान शिक्षण पध्दतीत राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण विषयक विचारांचा  वारसा जपत स्व.रावसाहेब जामकर साहेबांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण राहीले आहे. आजच्या युवाशक्तीने राजर्षी शाहू महाराजांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य लोकजीवनात स्वआचरणातून प्रवाही करावे,असे आवाहन समारोपात प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांनी केले.

       नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था, परभणी भूतपूर्व अध्यक्ष माजीमंञी भारतभूषण स्व. रावसाहेब जामकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ  राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी च्या वाड्.मय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ संगीता आवचार  परीक्षक प्राचार्य डॉ.प्रभाकर हरकळ,प्रा.डॉ.दत्तात्रय शिंदे, प्रा‌. महेश जाधव , डॉ.आशा गीरी आदींची उपस्थिती होती.

         प्राचार्य डॉ.प्रभाकर हरकळ, प्रा.डॉ.दत्तात्रय शिंदे यांनी परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त केले.स्पर्धक शुभम निकम,यांनी मनोगत व्यक्त केले.स्पर्धकांसाठी क्रमांक देण्यात आले होते.

             राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी ची घुमरे अनुजा केरबा हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु.५०००, मानचिन्ह, प्रमाणपत्र. महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर च्या शुभम मधुकर निकम याने व्दितीय क्रमांकाचे रु.३०००, मानचिन्ह, प्रमाणपत्र. यशवंत महाविद्यालय नांदेड चा प्रथमेश परमेश्वर तेलंग याने तृतीय क्रमांक रु २०००, मानचिन्ह, प्रमाणपत्र तर श्री.शिवाजी विधी महाविद्यालय परभणी चा कुणाल रामेश्वर बेंद्रे याने उत्तेजनार्थ रु.१०००, मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि बलभीम महाविद्यालय बीड चा चव्हाण रोहन नामदेव याने उत्तेजनार्थ रु १००० मानचिन्ह,प्रमाणपत्र असे पारितोषिक पटकावत प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचा स्विकार केला. प्रसंगी सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात  आले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरुण पडघन यांनी केले.तर आभार प्रा.डॉ.नसिम बेगम यांनी व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या