🌟मानवसेवा हिच ईश्वरसेवा समजुन आपले आयुष्य खर्ची घालणारे कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे अनंतात विलीन.....!


🌟कर्मयोगी सिद्धविनायक उपाख्य तात्यासाहेब बोंद्रे यांचे निधन🌟 


✍️ मोहन चौकेकर

चिखली : चिखली साकेगाव रोडवरील उजाड माळरानावर आपल्या भगिरथ प्रयत्नातुन शिक्षणाची गंगोत्री उभी करण्याबरोबरच सहकार क्षेत्राला चालना देणारे प्रख्यात रामायण निरूपनकार कर्मयोगी सिध्दविनायक उपाख्य तात्यासाहेब बोंद्रे यांचे वयाच्या 82 व्या वर्षी वृध्दापकाळाने आज दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे दुखःद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रत्नप्रभाबाई, दोन मुले जितेंद्र व माजी आमदार राहुल बोंद्रे तथा कन्या सौ.सुजाताताई, सुस्नुषा सौ.भारतीताई व अॅड.सौ.वृषालीताई बोंद्रे, नातवंडे असा बराच मोठा आप्त परीवार आहे. अनुराधा नगरीत मावळत्या सुर्याबरोबरच विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे व त्यांच्या कुटूंबियांनी मुखाग्नी देत  अखेरचा निरोप दिला . यावेळी बुलढाणा जिल्हयातील सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणीक, औद्योगिक  व इतर क्षेत्रातील गणमान्य मान्यवरांची मोठया संख्येने उपस्थिती होती. 


   
मानवसेवा हिच ईश्वर सेवा समजुन आपले आयुष्य मानवतेच्या कल्याणास्तव अव्हयातपणे वाहुन घेणारे कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांचा जन्म 12 सप्टेंबर 1942 रोजी झाला होता. मागिल काही महिन्यांपासुन वृध्दापकाळातील आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांच्यावर उपचारही सुरू होते. दरम्यान आज पहाटे त्यांचे देहावसान झाले, अंतीम दर्शनाकरीता कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांचे पार्थीव प्रथम त्यांच्या निवासस्थानी तद्नंतर त्यांची कर्मभुमी असलेल्या अनुराधा नगरीतील वानप्रस्थाश्रम पर्णकुटी येथे ठेवण्यात आले होते.

एक शिस्तप्रिय आणी कर्तव्याधिष्ठ कार्यप्रणालीचे पुरस्कर्ते म्हणुन सर्वदुर परीचीत असलेले कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे तत्वबोध रामायण यासह असंख्य धार्मीक ग्रंथांचे सखोल अभ्यासक, व निरूपण करणारे स्व. तात्यासाहेब बोंद्रे  यांनी आपल्या जिवनातील अंतीम पडावात वानपस्थाश्रमात जीवन जगले. स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांनी अध्यात्मीक साधनेसह साहित्यीक, आचार्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, राहुल सांकृत्यायन, आदी अनेक थोर   संतांचे साहीत्याचे ते अभ्यासक होते. अनुराधा परीवाराचे जनक स्व. तात्यासाहेब बोंद्रे  यांनी समता अर्बन को.आॅप के्रडीट  सोसायाटीच्या रूपाने विदर्भातील पहिल्या नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करीत श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणी, अनुराधा अर्बन को.आॅप बॅंक या व इतर माध्यमातुन त्यांनी सहकार चळवळीला उभारी दिली. याच बरोबर चिखली परीसराच्या शैक्षणीक विकासात तात्यासाहेब बोंद्रे यांनी उल्लेखणीय योगदान देत तक्षषिला महाविद्यालय, अनुराधा अभियांत्रीकी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, तंत्रनिकेतन, नर्सीग काॅलेज, आदी शिक्षणाची दालने उभारून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुर कुटूंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणीक प्रगतीच्या वाटा मोकळया करून दिल्या.

स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी सन 1971 साली नगर परीषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीत थेट जनतेतून प्रथमच नगराध्यक्ष म्हणुन आपल्या कारर्कीदीचा ठसा उमटवला होता. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच दर्जेदार शिक्षण आणी सर्दृड आरोग्य, याबरोबर मानसांच्या मुलभूत गरजा पुर्ततेच्या माध्यमातुन जनतेच्या मनावर ठसा उमटविला होता. दरम्यान 1990 साली अनुराधा मिषनची स्थापना करीत समाजातील गोरगगरीब आणी गरजु वर्गाला निशुल्क वैद्यकीय सुविधा व शस्त्रक्रीया उपलब्ध करून देण्याच्या हेतुने मानवसेवा हिच रूग्णसेवा या ब्रिद वाक्यानुसार गत 32 वर्षापासुन हजारो आरोग्य शिबीराचे आयोजन केले. यामाध्यमातुन लाखो रूग्णांनी याचा लाभही घेतला हे येथे उल्लेखणीय.

कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या निधनाची वार्ता संपुर्ण जिल्हयासह राज्यात वा-यासारखी पसरली. या दुखःद वार्तेचा समाचार कळताच माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या चिखली येथील राजाटाॅवर परीसरातील निवासस्थानी विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरासह सर्वच पक्षीय राजकीय, सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रमुख पदाधिका-यांनी कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांच्या पार्थिवाचे अंतीम दर्शन घेण्याकरीता गर्दी केली होती.

आज सायंकाळी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या अंत्यविधी प्रसंगी मावळत्या सुर्याबरोबरच विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे व त्यांच्या कुटूंबियांनी मुखाग्नी देत  अखेरचा निरोप दिला. याप्रसंगी  कॉग्रेसचे सरचिटणीस  खासदार मुकूलजी वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री अॅड.यषोमतीताई ठाकुर, बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले , विरोधी पक्षनेते ना.आंबादास दानवे, माजी आमदार बबनराव चौधरी, माजी जिल्हाधिकारी भा.ई.नगराळे यांचे संवेदना व्यक्त करणारे शोकसंदेष प्राप्त झाले तर खासदार प्रतापराव जाधव, आमदार डाॅ.संजय रायमुलकर, माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, राणा दिलीपकुमार सानंदा, श्यामभाऊ उमाळकर, शिवसेना संपर्कप्रमुख  प्रा.नरेंद्र खेडेकर, डाॅ.विकास बाहेकर, पत्रकार सुधिर चेके पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेशअप्पा खबुतरे यांनी कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जिवन चरित्रावर आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. यावेळी माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे, मराठा सेवा संघाचे पुरूषोत्तम खेडेकर, आमदार राजेश एकडे, आमदार श्वेताताई महाले, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, माजी आमदार विजयराज शिंदे, विजयराव खडसे, योगेंद्र गोडे, रामकृष्णदादा शेटे, सतिष गुप्त, अशिष रहाटे, विजय कोठारी, भाऊसाहेब लाहोटी, मा.आ. तोतारामजी कायंदे, स्वातीताई वाकेकर, मनिषाताई पवार, अॅड. नाजेर काझी, कासम गवळी, जालिंधर बुधवत, अॅड. शर्वरी तुपकर, शैलेष सावजी, नंदुभाऊ बोरे, प.पू स्वामी हरीचैतन्य महाराज, कैलास साखरे वैजापुर, डाॅ. मिलींद शाहीर सोलापुर, हाजी रषिदखाॅ जमादार, तहसिलदार अजितकुमार येळे, ठाणेदार विलास पाटील, संतोष खांडेभराड, धनंजय देशमुख, तेजेंद्रसिह चव्हाण, पत्रकार सुधिर चेके पाटील, गजानन धांडे, अनिल म्हस्के, सिध्दार्थ आराख, यांच्यासह बुलडाणा जिल्हा काॅग्रेस, जिल्हा राष्ट्रवादी काॅग्रेस, शिवसेना, महिला काॅग्रेस जिल्हा, तालुका व शहर पदाधिका-यांसह जिल्हातील चिखली मतदार संघातील पत्रकार बांधव, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते  तसेच परीसरातील नागरीक व महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी प्रा.उन्मेष जोषी व गणेश धुदंळे यांनी सुत्रसंचलन केले.......          

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या