💥परभणी येथील राष्ट्रजन फाउंडेशन कडून महाराजांचे बॅच बिल्ला वाटप करून शिव जयंती साजरी....!


💥या कार्यक्रमाचे उद्घाटक वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग आप्पा खापरे हे होते💥


परभणी : परभणी येथील राष्ट्रजन फाउंडेशन व वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व पूजन सोहळा -सर्व जेसीबी चालकांना महाराजांचे बॅच बिल्ले वाटप करण्यात आले जेसीबी पॉईंट गंगाखेड नाका 19 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटक वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग आप्पा खापरे , अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जेसीबी चालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जेसीबी चालक धुराजी मांजरे दगडवाडीकर प्रमुख पाहुणे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल , शिवसेनेचे संदीप देशमुख, दीपकगुर स्वामी , मंगेश सोनवणे ,त्यांच्या उपस्थितीमध्ये जेसीबी चालकांचा सत्कार करण्यात आला आणि परभणी जिल्ह्यातील शहरातील सर्व जेसीबी चालक महाराजांची बॅच बिल्ले घेणारे चालक ज्येष्ठ जेसीबी चालक प्रभाकर राव काळे, जेसीबी चालक धुराजी मांजरे राहुल सोनवणे, अंकुश देवकते, रफिक शेख, गजानन सुतारे, जेसीबी चालक इम्रान सय्यद, लक्ष्मण सुतारे, सय्यद सोनू राष्ट्रजन जेसीबी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी सर्वांना वाटप करण्यात आले जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष तथा आयोजक वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धार्मिक सेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर यांच्या वतीने सर्व जेसीबी चालकांना बॅच बिल्ले वाटप करण्यात आले हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देऊन संपन्न झाला अशी माहिती धार्मिक सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या