💥मराठी भाषेतून देखील भारतीय प्रशासकीय सेवेत येता येते - डॉ.नरेशचंद्र काठोळे


💥कृषि महाविद्यालय लातूर येथे प्रेरणादायी व्याख्यानमालेचे आयोजन💥 


पुर्णा : स्पर्धेच्या युगात कृषि शाखेचे विद्यार्थी मागे पडता कामा नये व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग कामगिरी करावी ह्या उद्देशाने कृषि महाविद्यालय लातूर येथे दि. ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी कृषि महाविद्यालयातील कृषि पदवी व कृषि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानमालेचे आयोजन विद्यार्थी समुपदेशन व नियुक्ती कक्षाच्या वतीने करण्यात आले होते.


सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नरेशचंद्र काठोळे ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा मराठी भाषेतून परीक्षा देऊन कलेक्टर होऊ शकतो ह्यावर भर दिला. तसेच प्रमुख वक्ते श्री.नागेश जोंधळे ह्यांनी 'BORN TO WIN' ह्या विषयावर बोलताना त्यांना कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी नियोजन व कृतीचे महत्त्व नमूद केले तसेच यशस्वी होत असताना कोणकोणत्या गोष्टीवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नोकरी, बँकिंग, व्यवसायातही इंग्रजी, संभाषण कौशल्य, बुद्धिमापन याविषयी माहिती दिली. व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी भूषविले. अध्यक्षीय समारोपात त्यांनी जोखीम घेऊन स्पर्धेत उतरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. ह्या कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यार्थी समुपदेशन व नियुक्ती कक्षाचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय भामरे ह्यांनी केले.  ह्या कार्यक्रमाला धम्मानंद सरवदे ,डॉ. विलास टाकणखार,  डॉ. विठोबा मुळेकर, प्रा. संतोष कांबळे, डॉ. राजेश शेळके, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. मकरंद भोगावकर, डॉ. दयानंद मोरे, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. प्रभाकर अडसुळ, डॉ.शिवशंकर पोले, डॉ. संघर्ष शृंगारे , श्री. संतोष वाघमारे, श्री. राहुलदेव भवाळे उपस्थित होते. तसेच अधिकारी, कर्मचारी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ह्यांनी व्याख्यानमालेचा लाभ घेतला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या