🌟पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी....!


🌟या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे हे होते🌟

पूर्णा (दि.२३ फेब्रुवारी) प्रतिनिधी - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे यांनी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे  कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. डी. सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दीपमाला पाटोदे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या