💥परभणी शहरातील टायपिंग व स्टेनो परीक्षेतील गैरव्यवहार तात्काळ थांबवुन संबंधित केंद्रप्रमुखास निलंबित करा....!


💥संभाजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी💥


परभणी (दि.०९ फेब्रुवारी) - परभणी शहरातील चार सेंटरवर दि.०७ फेब्रुवारी २०२३ पासून टायपिंग व स्टेनोच्या परीक्षा चालू असून या परीक्षा दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणार आहेत, परंतु या परीक्षेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारातून गैरप्रकार घडत आहेत परीक्षार्थीस बाजूला बसवुन त्याच्या जागेवर डमी असणारा विद्यार्थी टायपिंग करत आहे आणि परीक्षा देत आहे हे सर्व प्रकार राजरोजपणे चालू आहेत असे प्रकार करण्यासाठी सेंटर मॅनेज करून विद्यार्थ्यांकडून जास्तीची अनामत रक्कम घेतली जाते आणि त्यातून विद्यार्थ्यांना पास करण्याची हमी दिली जाते. विद्यार्थ्यांना टाईप येत असो किंवा नसो त्याला फक्त मशीन वर बसवुन त्याच्या बाजूला डमी विद्यार्थी बसवला जातो किंवा त्याने सोडवलेला पेपर हा कोराच ठेवून घेतला जातो आणि त्याच्या पश्चात एक्सपर्ट असणाऱ्या विद्यार्थ्याकडून तो पेपर सोडवुन घेतला जातो असे प्रकार परभणी शहरातील कारेगाव येथील मन्नत स्वामी सेंटर,पिंगळी रोडवरील सेंटर,वसमत रोड येथील सारंग स्वामी यांचे सेंटर आणि जिंतूर रोड येथील शारदा महाविद्यालयाचे सेंटर या सर्व सेंटरवर परीक्षार्थी केवळ नावालाच असून त्यांच्या जागी डमी असणारा एक्सपर्ट विद्यार्थी टायपिंगची परीक्षा देत असल्यामुळे या सर्व सेंटरवर पूर्ण वेळ प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे बैठे पथक नेमण्यात यावे जेणेकरून या परीक्षेतील गैरप्रकार थांबवला जाईल आणि मागे घेतलेले पेपर पुन्हा घेण्यात यावेत कारण सदरील परीक्षा ह्या १००% गैरमार्गातून झालेल्या आहेत प्रत्येक परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी कडून किमान दोन ते पाच हजार रुपये जास्तीचे घेऊन त्यांना पास करण्याची हमी दिली जाते यातून लाखो रुपयांचा व्यवहार या परीक्षेच्या माध्यमातून होत आहे ,काल काही परीक्षा केंद्रावर डमी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली परंतु केंद्रप्रमुखांनी सदरील प्रकार कारवाई करण्याऐवजी आर्थिक व्यवहारातून मिटवल्याचे समजते तरी माननीय साहेबांना विनंती की उर्वरित सर्व परीक्षा या पूर्णवेळ कर्तव्यदक्ष बैठे पथकाच्या नियोजनातच घेण्यात याव्यात आणि मागील झालेल्या परीक्षा बाबत सखोल चौकशी करून त्या ठिकाणी असणाऱ्या केंद्रप्रमुखांना तात्काळ निर्मित करून त्या पुन्हा घेण्यात याव्या अन्यथा संभाजी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल केलेल्या उचित कारवाईची माहिती अर्जदारास देण्यात यावी असेही संभाजी सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले असून या निवेदनावर संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे,परभणी जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर,परभणी शहराध्यक्ष अरुण पवार,लष्करे शिवबा मित्र मंडळ चे अध्यक्ष गंगाराम शिंदे,जयश घोगरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या