💥पुर्णा शहरातील महावीर नगरात प्रभू विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी....!


💥यावेळी प्रभू विश्वकर्मा जयंतीसाठी उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले होते💥

पूर्णा (दि.०३ फेब्रुवारी) - शहरातील महावीरनगरात तारीख ३ फेब्रुवारी रोजी प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी प्रभू विश्वकर्मा जयंतीसाठी उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमास असंख्य पुरुष व महिला मंडळींची उपस्थिती होती.सदरील प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजाराम पांचाळ, उपाध्यक्ष नरेश पांचाळ, कोषाध्यक्ष गणेश पांचाळ, सचिव रामेश्वर भाले, संजय पांचाळ यांच्या सह आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले असून पूर्णा शहरात प्रभू विश्वकर्मा यांच्या मंदिरासाठी नगरपरिषद प्रशासनाने त्वरित जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या