💥गंगाखेड तालुक्यातील मौ.वृंदावन जवळा (रु ) येथे शिवजयंती निमित्त वृंदावन जवळा (रू) येथे भरगच्च कार्यक्रम....!


💥शिवजन्मोत्सवा निमित्त श्री हभप.गणेश महाराज कापसीकर यांच्या किर्तनाचे आयोजन💥 

गंगाखेड (दि.१८ फेब्रुवारी) - तालुक्यातील मौज वृंदावन जवळा (रु ) येथे दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ०८-०० वाजता. भगवा ध्वज फडकवण्यात येईल. श्री मंचक  बापूराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. 


त्यानंतर दुग्धाभिषेक अंकुश कदम यांच्या हस्ते होईल, त्यानंतर सायंकाळी ठीक ६:३० वाजता महिलांच्या हस्ते ३८४ दिवे लावण्यात येतील, त्यानंतर आरतीचे मानकरी, श्याम विठ्ठलराव  कदम यांच्या हस्ते होईल, दि.२० फेब्रुवारी रोजी गावातील महिलांचे  सांस्कृतिक कार्यक्रम होईल, दि.२१ फेब्रुवारी रोज महिलांचे व्याख्याने भाषण होतील. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाषणे होतील, शिवश्री, कुमारी समीक्षा आत्माराम मुळे, कु.प्रीती सूर्यभान  कदम, कु. कल्याणी लक्ष्मणराव कदम, यांची व्याख्याने होतील. दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते १० यावेळी गॅदरिंग चा कार्यक्रम होईल. दिनांक २४ फेब्रुवारी   रोजी रा. ८ ते १० श्री ह भ प.गणेश महाराज कापसीकर, यांचे कीर्तन होईल, मृदंगाचार्य गोपाळ महाराज जवळेकर,गायनाचार्य भागवत महाराज सोळंके, कारभारी महाराज रूमने कर,माऊली महाराज रूमनेकर, यांची उपस्थिती.दिनांक २५ फेब्रुवारी रोजी  गावामध्ये भव्य अशी मिरवणूक होईल.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या