🌟औरंगाबाद येथे पाच भावंडासह बहिणीच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा संपन्न....!


🌟उत्साहात सर्व नातलगांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे सिडको एन.1 भक्ती गणपती मंदिर या ठिकाणी संपन्न🌟

जिंतूर प्रतिनिधी /  बी. डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील रहिवासी परंतु आज औरंगाबाद येथे स्थायिक झालेले देशपांडे चारठाणकर कुटुंबात 75 ते 93 वर्ष झालेल्या मंडळींचा त्यांच्या प्रति ऋण म्हणून त्यांच्या मुलं, मुली, सुना, नातवंड यांनी पाच भाऊ तर एक बहीण यांचा आनंदाचा अमृत महोत्सव व सहस्त्रचंद्र दर्शनांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सर्व नातलगांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे सिडको एन.1 भक्ती गणपती मंदिर या ठिकाणी संपन्न झाला.


याबाबत माहिती अशी की चारठाणा तालुका जिंतूर येथील रहिवासी असलेले परंतु आज नोकरी कामानिमीत्य औरंगाबाद येथे स्थायिक झालेले देशपांडे चारठाणकर कुटुंब व या कुटुंबांसाठी ज्यांनी अहोरात्र जिवांची रान करून त्यांच्या कुटुंबांसाठी झटले आज त्यांचे वय कोणाची 75 तर 93 वर्ष झाल्याने त्यांना वृद्धापकाळ असल्याने त्यांना एकटेपणा वाटूनये त्यामुळे त्यांचे मुले, मुली, सुना,जावाई, नातवंड यांनी त्यांचा सहस्त्र दर्शन व अमृत महोत्सवांचा कार्यक्रम सिडको एन.1 मधील भक्ती गणपती मंदिरात दिनांक 26 /02 /2023 रोजी मोठ्या थाटात संपन्न करून त्यांची साखर,गुळ व नारळाने तुला करण्यात आली ते वयोवृद्ध चारठाणकर म्हणजे 

श्री प्रभाकर गणपतराव देशपांडे, सौ.सुलभा व बाळकृष्ण गणपतराव देशपांडे, सौ. सुनीता व सुधाकरराव गणपतराव देशपांडे,सौ. सुमती व अरविंदराव गणपतराव देशपांडे,सौ. विद्या व अशोकराव गणपतराव देशपांडे आणि त्यांच्या बहिणी श्रीमती वृंदा सुधाकरराव आडगावकर या सख्ख्या बहिण भावांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी होम हवन व त्यांना नातवांकडून फुल वाहने व सर्वांची साखर, नारळ , गुळ व 101 दीव्यांनी तुला केली.सर्व जिन्नस स्नेह सावली वृद्ध आश्रमात भेट दिल्या. यावेळी उपस्थीतांना विभा धर्माधिकारी, सौ.अनुराधा श्रीपाद देशपांडे, सौ .रोहिणी सुधाकरराव सोनवटकर,  यांनी आपले मनोगत व सत्कारमूर्ती विषयी आपलेपणा व्यक्त केला. तर या कार्यक्रमासाठी श्री व सौ.विजय,विनोद,प्रमोद, प्रफुल्ल देशपांडे, आनंद,मनोज ,मंगेश,प्रविण,प्रशांत, सौ. रोहिणी सोनवटकर,सौ. रंजना  कुरुंदकर,सौ.मंजुषा औंढेकर,अपर्णा मानकेश्वर, प्रवीण देशपांडे, गणेश आडगावकर आदी व सर्व मुलं, मुली, सुना,जावाई,नातवंड, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या