💥पुर्णेतील रेल्वे प्रश्नी पूर्णा संघर्ष समितीची नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डिआरएम) यांच्या सोबत सकारात्मक चर्चा....!


💥त्यांच्या आधिकारात असणाऱ्या मागण्यांची तातडीने पुर्तता करण्याचे आदेश त्यांनी संबंधित आधिकाऱ्यांना दिले💥

पूर्णा (दि.१४ फेब्रुवारी) : पुर्णा येथील रेल्वेच्या प्रश्नांवर पूर्णा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या बंदच्या पाश्र्वभूमीवर आज मंगळवार दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सरदार ओपिंदरसिंग यांच्याशी त्यांच्या कार्यालयात पूर्णा संघर्ष समितीच्या समन्वय समितीच्या शिस्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा झाली या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना संघर्ष समिती कडून देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा झाली यातील त्यांच्या आधिकारात असणाऱ्या मागण्यांची तातडीने पुर्तता करण्याचे आदेश त्यांनी संबंधित आधिकाऱ्याना दिले.


पुर्णेतील प्लॅटफॉर्म नंबर एक वर तिकीट मिळण्याची त्वरित व्यवस्था करण्यात येईल तसेच प्लॅटफॉर्म नंबर एक ते चार वर येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या निश्चित करण्यात येतील.कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय पूर्नेतील कोणत्याही कर्मचाऱ्यास पुर्णेतून हलविले जाणार नाही.रेल्वे दवाखान्यातील स्टाफ आणि औषधी यांचे कडे जातीने लक्ष देवू व सिध्दार्थ नगर ते बुद्ध विहारास जोडणारा पादचारी पुल त्वरित होण्यासाठी पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडे अंदाजपत्रक पाठविले आहे.त्यातील त्यांच्या निधीचा वाटा त्यांनी आमच्याकडे जमा करावा,त्यांनी तो पुल बांधण्याची जबाबदारी घ्यावी.रेल्वे आपला वाटा नगर परिषदेकडे वर्ग करण्यास तयार असल्याचेही रेल्वे व्यवस्थापकांनी चर्चे दरम्यान सांगितले.

विशेष गाड्यांच्या नावाखाली तिकीटाची आकारणी जास्त केली जाते,प्रस्तावित इलेक्ट्रिक शेड,डेमूमेन्टेनस शेड,आदी बाबत मी कोणताही निर्णय घेवू शकत नाही.तो दिल्ली रेल्वे बोर्डाचा विषय आणि आधिकर आहे.अशा धोरणात्मक निर्णयांसाठी मा.खासदार,मंत्री महोदय,आदी लोक प्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले.रेल्वे परिसरतील मोडखलीस आलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करू असेही ते शिष्टमंडळाला सोबत झालेल्या चर्चेत बोलले.राष्ट्रीय सुरक्षा आयुक्त मा.विप्लबदास गुप्ता यांचीही संघर्ष समितीच्या समन्वय समिती ने भेट घेवून रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी वाढविण्याची मागणी केली असता त्यांनी त्याबाबत सकारात्मक चर्चा करून आवश्यक ते सहकार्य करण्याचा शब्द दिला.

 यावेळी पूर्णा संघर्ष समितीच्या समन्वय समितीत रिपाई नेते प्रकाश कांबळे. अब्दुल मुजीब अब्दुल हबीब ,शेख नसीर,डॉ.अजयसिंह ठाकूर,मो.शफीक,प्रदीप ननाव आदींचा समावेश होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या