💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस स्थानकात नव्याने रूजू झालेले सहाय्यक पो.नि.कपिल शेळके यांचा सत्कार...!


💥ताडकळस मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला सत्कार💥

पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - तालुक्यातील ताडकळस येथील पोलीस स्थानकात नव्याने रूजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांचा आज रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी ताडकळस मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुष्पहार घालून व पेढा भरवून स्वागत करण्यात आले.

 यावेळी ताडकळस मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर (स्वामी) ,उपाध्यक्ष फेरोज पठाण ,कोषाध्यक्ष देवानंद नावकिकर ,सल्लागार शिवाजी शिराळे ,सहसल्लागार धमप्पाल हनवते ,शमीम पठाण ,संजय कानडे ,जनार्दन आवरगंड ,बाळासाहेब राऊत ,सचिन सोनकांबळे आदी पत्रकार बांधवांसह शुभम काळे आदी उपस्थित होते.

*********************************************

💥ताडकळस पोलिस स्थानकातील सहाय्यक पो.नि.सय्यद मुक्तार यांची जिंतूर येथे बदली...!

💥ताडकळस मराठी पत्रकार संघाच्या वतीने निरोप समारंभाच्या अनुषंगाने पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन केला सत्कार :-


ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद मुक्तार यांची नुकतीच जिंतूर पोलीस ठाण्यास बदली झाली असल्याच्या अनुषंगाने ताडकळस मराठी पत्रकार संघाच्या वतीने सपोनि सय्यद मुक्तार यांना पुष्पहार घालून व पेढा भरवून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ताडकळस मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर (स्वामी) ,उपाध्यक्ष फेरोज पठाण ,कोषाध्यक्ष देवानंद नावकिकर ,सल्लागार शिवाजी शिराळे ,सहसल्लागार धमप्पाल हनवते ,शमीम पठाण ,संजय कानडे ,जनार्दन आवरगंड ,बाळासाहेब राऊत ,सचिन सोनकांबळे आदी पत्रकार बांधवांसह शुभम काळे आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या