🌟दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील भाषा/प्रांतवाद्यांसह असंतुष्ट राजकारण्यांनी उगवला पुर्णेकरांवर सुड....!


🌟कोट्ट्यावधीच्या संपत्तीची अक्षरशः धुळधान : साडेतीन दशकापुर्वी होती मराठवाड्यातील सर्वात मोठे जंक्शन म्हणून पुर्णेची ओळख🌟


🌟 तेल ही गेले...तुपही गेले अन् हाती फक्त धुपाटने आले अशी झाली पुर्णेकरांची अवस्था ?

(भाग कूर.०१ - परखड सत्य - चौधरी दिनेश) 

निजाम व ब्रिटिश काळापासूनच संपूर्ण मराठवाड्यात अत्यंत महत्वाचे रेल्वे जंक्शन व पुलींग पॉईंट म्हणून व एकेकाळी मसाल्याची सर्वात मोठी व्यापारपेठ म्हणून स्वतंत्र ओळख असलेल्या पुर्णा रेल्वे जंक्शनची अवस्था अवघ्या साडेतीन चार दशकाच्या कालावधीतच पुसली जाऊन संपूर्ण मराठवाड्यातील अविकसित व भकास रेल्वे स्थानक म्हणून नावारुपाला येईल अशी पुसटही कल्पना पुर्णेकरांच्या मनात आली नसेल...सर्वात महत्वाचे व सर्वात मोठे रेल्वे जंक्शन ज्या ठिकाणी हजारो रेल्वे कर्मचारी दिवसरात्र काम करीत होते त्यामुळे व्यापारपेठ अक्षरशः गजबजलेली दिसायची परंतु राजकीय क्षेत्रातील असंतुष्ट आत्म्यांसह दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनात कार्यरत भाषावाद/प्रांतवादाला प्राधान्य देणाऱ्या महाराष्ट्र/मराठी भाषीक द्वेष्ट्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची वक्रदृष्टी या सर्वात सधन असलेल्या पुर्णा जंक्शन वरील वैभवावर पडल्यामूळे 'गिधाडाने जसे मृत जनावरांच्या शरीराचे लचके तोडावे त्या पध्दतीनेच जणूकाही या मनुष्यरुपी गिधाडांनी येथील वैभवाचे लचके तोडण्यास सुरुवात केली असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही.


🌟राजकीय मतभेदानेच केले पुर्णेच्या सर्वांगीन विकासाच्या नावेला अक्षरशः असंख्य छेद : 

तत्कालीन राज्यकर्ते/राजकीय लोकप्रतिनिधी/राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत गटबाजीसह पक्षभेद व दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील भाषाभेद/प्रांतभेदाला खतपाणी घालणारे अधिकारी/कर्मचारी यांच्यासह कामगार संघटना सोईस्कररित्या पुर्णा रेल्वे जंक्शनची वाट लावत असतांना मात्र मागील तिन/साडेतील दशकापासून जनसामान्यांच्या मतांवर निवडून येणारे लोकप्रतिनिधी/तथाकथित समाजसेवक/व्यापारी संघटनांचे पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कुंभकर्णी झोपेत होते की काय ? असा प्रश्न सर्वसामान्य जनते समोर अक्षरशः शेषनागा प्रमाणे फना काढून उभा टाकला असतांना या अत्यंत महत्वपुर्ण महत्वपुर्ण प्रश्नाचे उत्तर शोधण्याची यत्किंचितही ऐपत देखील नसलेले संधीसाधू लोक आज विकासाच्या नावावर तरुण पिढीला भरकटवण्याचा प्रयत्न करतांना पाहावयास मिळत आहे.

🌟पुर्णेच्या हक्काचे विभागीय व्यवस्थापक कार्यालयांसह असंख्य महत्वपुर्ण कार्यालय नांदेडला स्थलांतरीत :


सिकंद्राबाद रेल्वे रेल्वे डिवीजनचे दि.०१ एप्रिल २००३ रोजी विभाजन करण्यात येवून नांदेड/गुंटूर या दोन विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयांची स्थापना करण्यात आली यावेळी जाणीवपूर्वक पुर्णेत तब्बल १८० एक्कर जमीनीसह सर्व सुखसुविधा उपलब्ध असतांना देखील पुर्णेच्या हक्काचे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाची नांदेडला स्थापना करण्यात आली अश्या प्रकारे सन एप्रिल २००३ पासून पुर्णेकरांवर सुरु झालेले सुडसत्र अद्यापही थांबलेले नाही दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय जरी नांदेडला स्थापन करण्यात आले तरी निदान उपविभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय पुर्णेत असायला हवे होते परंतु दमरे प्रशासनातील भाषा/प्रांतवादाची विषारी गरळ ओकणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसह असंतुष्ठ राजकारण्यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय नांदेडला स्थापीत झाल्यानंतर पुर्णा जंक्शन स्थानकावरील रेल्वे लोको शेड वर्कशॉप,रेल्वे इंग्रजी/तेलगू/मराठी माध्यम शाळा,डिईएम ऑफिस,एईएन ऑफिस,आयओडब्ल्यू ऑफिस,पिडब्ल्यूडी ऑफिस,टिएक्सआर ऑफिस,क्र्यू बुकींग लॉबी,रेल्वे सुरक्षा बल पोलिस स्टेशन,लोहमार्ग रेल्वे पोलिस स्टेशन,टिटीई ऑफिस,रेल्वे रुग्नालय - १,एरिया ऑफिस मिनी डिआरएम ऑफिस,कंट्रोल ऑफिस,रेस्ट हाऊस रनिंग रुम,गुड्स शेड,२ पीट लाईन,मार्शल यार्ड,ब्रेक डाऊन कर्मचारी ऑफिस,ट्रेन लाईटींग स्टॉफ,ड्रायव्हर/गार्ड रनिंग रुम आदी महत्वाची कार्यालय पुर्णेतून स्थलांतरीत केली जात असतांना स्थानिक लोकप्रतिनिधींसह व्यापारी संघटना/सामाजिक संघटना/विविध राजकीय पक्ष पदाधिकारी कुंभकर्णी झोपेत होते की काय ? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच म्हणावे लागेल...


🌟पुर्णेकरांच्या आंदोलना नंतर देखील क्र्यू-बुकींग लॉबीचे स्थलांतर थांबले नाही :

पुर्णा जंक्शन येथील ब्रिटिश/निजाम काळापासून असलेली रनिंग स्टॉफ एक्सप्रेस/पेसेंटर स्टॉफची क्र्यू-बुकींग लॉबीच्या स्थलांतराचा कुटील डाव दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील भाषा/प्रांतवाद्यांसह असंतुष्ट राजकारण्यांकडून आखला जात असल्याची कुणकूण लागताच पुर्णा शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य जनता व्यापारी प्रतिष्ठित नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने उठाव करीत रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन केले परंतु या आंदोलनाला न जुमानता तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी पुर्णा जंक्शन येथील क्र्यू-बुकींग लॉबीचे लचके तोडल्यागत विभाजन करीत एक्सप्रेस क्र्यू-बुकींग लॉबी नांदेडला स्थलांतरीत केली असाच एक गंभीर प्रकार दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील भाषा/प्रांतवादी अधिकाऱ्यांसह असंतुष्ट राजकारण्यांनी केल्याचे निदर्शनास येत असून पुर्णेत जागेसह सर्व प्रकारच्या सुविधा असतांना देखील इलेक्ट्रिक लोको टिन शेड नांदेड येथे पळवण्याचा गंभीर प्रकार घडला आहे दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन व असंतुष्ट राजकारण्यांनी घेतलेला हा निर्णय बदलण्याची क्षमता परभणी जिल्ह्यातील ना लोकप्रतिनिधींमध्ये आहे नाही व्यापारी संघटनांमध्ये नाही सामाजिक संघटनांमध्ये आता मात्र तेलही गेले अन् तुपही गेले अन् हाती मात्र धुपाटने आले अशी एकंदर अवस्था आम्हा पुर्णेकरांची झाली आहा......


 


  





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या