💥पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे कर्मचारी राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी.....!


💥सेवातंर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करा,जुनी पेन्शन योजना लागू करा आदीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन💥

पूर्णा (दि.१६ फेब्रुवारी) - महाराष्ट्र शासनाच्या विरोधातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या  संदर्भाने पुकारण्यात आलेल्या  आंदोलनात पूर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

सेवातंर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आदी कर्मचार्‍यांच्या मागण्या संदर्भात टप्या टप्याने हे आंदोलन सुरू आहे. ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला , १४ फेब्रुवारी २०२३ रोजी अवकाश काळात निदर्शने केली गेली , १५ फेब्रुवारी २०२३ काळ्या फिती लावून कार्यालयात काम केले गेले आणि आज दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी लाक्षणिक संप करण्यात आला आहे. शासनाने जर  कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढे २० फेब्रुवारी 2023 पासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराही संघटने कडून देण्यात आला आहे.  या संपात महाविद्यालयाचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्ता कदम, सचिव रामेश्वर भाले यांच्या सोबतच माणिक कदम, सूर्यकांत भोसले, यादव कल्लाळीकर,  ज्ञानोबा कदम, ज्ञानोबा मुळे, बालाजी पाटील आदी कर्मचारी लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाततील न्याय मागण्या संदर्भातील आंदोलनास स्वामुक्टा संघटनेचे सचिव प्राध्यापक डॉ. विजय भोपाळे  प्राध्यापक डॉ. संजय कसाब, प्रा.डॉ.भारत चापके,प्रा.डॉ.मारोती भोसले, प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी, प्रा.डॉ. शारदा बंडे,प्रा.डॉ.प्रभाकर कीर्तनकार,  आदी प्राध्यापकांनी उपस्थित राहून पाठींबा दर्शविला. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वस्वी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी माणिक कदम,सूर्यकांत भोसले, ज्ञानोबा मुळे, ज्ञानोबा कदम, यादव कल्लाळीकर,बालाजी पाटील आदींनी परिश्रम घेतले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या