💥परभणी जिल्ह्यातील पालम येथील सराफा दुकानावर दोन सशस्त्र दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून घातला जबरी दरोडा...!


💥सराफा दुकानातील सोन्या-चांदीचे २० लाखाचे दागिने पळवले दरोडेखोरांनी💥  

परभणी (दि.०५ फेब्रुवारी) : परभणी जिल्ह्यातील पालम शहरातील मोढा बाजार परिसरातील एका सराफा दुकानातून काल शनिवार दि.०४ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ०८-०० ते ०८-१५ वाजेच्या सुमारास अज्ञात दोन दरोडेखोरांनी सराफा व्यापाऱ्यास बंदुक व चाकूचा धाक दाखवून सुमारे २० लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले.

पालम शहरात काल शनिवारी रात्री ०८-१५ वाजेच्या सुमारास ही खळबजनक घटना घडली. मोंढ्यातील सिद्धनाथ ज्वेलर्स हे दुकान शनिवारी रात्री दैनंदिन व्यवहार आटोपून नित्यनेमाप्रमाणे बंद होत होते. त्यावेळी दोघे चोरटे अचानक दुकानात घुसले बंदुकीचा व चाकूचा भाक दाखवून या दोघा चोरट्यांनी सराफ व्यापारी व मुनिमास अक्षरशः धमकावले. पाठोपाठ काही मिनिटात दुकानातील झुंबर, मनी मंगळसूत्र, गंठण, अंगठ्या, चैन, वगैरे सोन्या चांदीचे दागिने मोठ्या सफाईने लंपास केले.

विशेष म्हणजे आसपासच्या काही  व्यापाऱ्यांनी धाव घेतली खरी; परंतु या चोरट्यांनी पोबारा केला,पालम पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीपर्यंत या दोघा चोरट्यांचा शोध घ्यावयाचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे व मारुती कारेवाड यांच्यासह कर्मचारी या प्रकरणात तपास कार्यात गुंतले आहेत.सराफा व्यापाऱ्यास लूटल्याने जिल्ह्यातील सराफा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या