💥पोहरागड येथे होणाऱ्या सेवाध्वज सोहळ्याचे साक्षीदार व्हा : विकास अंबरवाडीकर


💥देशभरातील संत,महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरागड येथे १२ फेब्रुवारीला भव्य-दिव्य १५१ फूट उंचीच्या सेवा ध्वजाची उभारणी💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१० फेब्रुवारी) - देशभरातील तमाम हिंदू गोरबंजारा समाज बांधवाची काशी असणाऱ्या आणि क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या १२ फेब्रुवारी रोजी देशभरातील संत, महंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य-दिव्य असा १५१ फूट उंचीचा सेवाध्वज उभारणी आणि क्रांतिकारी सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा पार पडणार आहे.

 त्या ठिकाणी दररोज हजारो भाविक संपूर्ण भारतभरातून दर्शनासाठी येत असतात येणाऱ्या भाविकांची निवास, भोजन, स्नान या सर्वांची व्यवस्था व्हावी त्याच बरोबर पोहरागड तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा या करीता कॅबिनेट मंत्री संजयभाऊ राठोड यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनातर्फे ५९३ कोटी रुपये असा भक्कम निधी मंजूर करण्यात आलेला असून. या मधील नियोजित असणाऱ्या कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण समाज बांधवांनी मोठ्या ताकतीने उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव अंबरवाडीकर यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या