💥वाशिम पोलिस दलातील पदोन्नतीस पात्र असलेल्या १२ पोलीस अंमलदारांना पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पदोन्नती...!


💥पोलिस अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण💥


(फुलचंद भगत)

वाशिम :- वाशिम पोलीस दलातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत व पदोन्नतीस पात्र असलेल्या १२ पोलीस अंमलदारांच्या पदोन्नतीचे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी दिले. या आदेशांन्वये ०७ पोलीस अंमलदारांना पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदारपदी तर ०५ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार पदावरून सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नत करण्यात आले आहे.

          त्यानिमित्ताने दि.०३.०२.२०२३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात सर्व पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदारांच्या पदोन्नती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्याहस्ते पदोन्नत झालेल्या पोलीस अंमलदारांना पदोन्नतीच्या फीत लावून पदोन्नती प्रदान केली तसेच पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी मा.पोलीस अधीक्षकांनी अंमलदारांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पदोन्नत झालेल्या अंमलदारांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व वेळेवर विनाविलंब पदोन्नती दिल्याबद्दल मा.पोलीस अधीक्षकांचे आभार मानले.  पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कल्याणासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर आहे.

          सदर पदोन्नती सोहळा मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली राखीव पोलीस निरीक्षक श्री.मांगीलाल पवार, पोलीस मुख्यालय वाशिम तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे उपस्थितीत पार पडला.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या