💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट हेडलाईन्स बातम्या....!


💥देशातील शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार💥

✍️ मोहन चौकेकर

* करदात्यांना मोठा दिलासा! 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार; अर्थसंकल्प 2023-24 सादर, ऋषी क्षेत्रासाठी 20 लाख कोटींची तरतूद, रेल्वे साठी आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद.

* पुण्यातील 250 हून अधिक लोकांची 5 ते 6 कोटी रुपयांची फसवणूक; नासा आणि इस्रोच्या नावाने अनेकांना गंडा घातल्याची घटना. 

* आदिवासी विकास मिशनअंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38 हजार  शिक्षकांची नियुक्ती होणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा.

* प्युअर EVने लॉंच केली नवीन इलेक्ट्रिक बाईक, इकोड्रिफ्ट संपूर्ण चार्ज केल्यावर 135 किमी धावणार असल्याचा कंपनीचा दावा.

* देशात 10 हजार बायो इनपूट रिसोर्स सेंटरची उभारणी होणार, 1 कोटी शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंगसाठी सरकार प्रोत्साहित करणार

* देशातील शेतकऱ्यांसाठी  डिजीटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार, कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा.

* भारत विरुद्ध न्यूझीलंड: भारताच्या 12.3 ओव्हरमध्ये 3 बाद 125 धावा; शुभमन गिलच्या नाबाद 52 धावा.

 * 'बालिका वधू' फेम अभिनेत्री हंसी परमार अडकली  लग्नबंधनात, महाराष्ट्रात करिअर केलं मात्र लग्नानंतर आता मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये जाणार.

* शेअर बाजार: सेन्सेक्स 59,708.08 (159+) अंकांवर तर निफ्टी 17,616.30 (-45) अंकांवर बंद.

* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमार्फत 17 महिलांना प्रशिक्षण सुरू, राज्यात पहिल्यांदाच महिला चालवणार एसटी बस

* गुलमर्गमध्ये भीषण हिमस्खलन; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू.

* अनिल देशमुखांना आणखी एक दिलासा; PA कुंदन शिंदे यांनाही मिळाला जामीन.

* औरंगाबादमधील औद्योगीक वासहतीतील सी सेक्टरमध्ये लागली भीषण आग.

* क्रिडा जगतासाठी अच्छे दिन! मोदी सरकारनं खेलो इंडियाचं बजेट 400 कोटींनी वाढवलं.

* गरिबांना २०२४ पर्यंत मोफत रेशन मिळणार - निर्मला सीतारामन

* नंदुरबारमध्ये भीषण अपघात, 11 गरोदर मातांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली

* ज्येष्ठ नागरिकांसाठी डिपॉझिट मर्याद १५ लाखांवरुन ३० लाखांवर करण्यात आली आहे - निर्मला सीतारामन

* हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने देशाच बजेट हे हिंदीमधून सादर झाला पाहिजे - आ.बच्चू कडू

* अर्थसंकल्पावर शेअर बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया! एक हजार अंकांच्या तेजीनंतर सेन्सेक्समध्ये घसरण

* फोर्ब्सचा अहवाल: मुकेश अंबानी 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; गौतम अदानींना टाकले मागे.

* राज्यात थंडी वाढणार...जम्मू-कश्मीर,लडाखमध्ये मोठा हिमवर्षाव, पुढच्या 2 दिवसांत राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार असल्याची हवामान विभागाने दिली माहिती.

* किरणोत्सर्गी कॅप्सूल सापडली! ऑस्ट्रेलियात 20 दिवसांपूर्वी हरवलेली छोटीशी किरणोत्सर्गी कॅप्सूल सापडली, कॅप्सूलच्या जवळ गेल्यास त्वचा जळणे व इतर घातक आजारांचा होता धोका

* 'पॅनकार्ड' बाबत मोठी बातमी: पॅन कार्डला कॉमन बिझनेस आयडेंटिफायर तर डिजीलॉकर आधार पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार.

* दुसऱ्यांदा सर्वोच्च जीएसटी संकलन: जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलन 1.55 लाख कोटींहून अधिक, जीएसटी लागू झाल्यापासून दुसऱ्यांदा सर्वोच्च कर संकलन 

* शहादा येथे भीषण अपघात! 10 ते 12 गरोदर माता असलेल्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चालकासह जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.

* शहजादा' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले, 'पठाण'मुळे आता 17 फेब्रुवारीला रिलीज होणार, कार्तिक आर्यन म्हणाला - 200 कोटींचा टप्पा ओलांडणार.                                    

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या