💥राज्यात हिंदुहृदय सम्राटांच्या विचारांचा एकच नाथ : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का....!


💥'शिवसेना नावासह धनुष्य बाण' चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाले💥

💥आता मंत्रीमंडळ विस्तारासह महानगरपालिका,नगरपालिका,जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच घोषित होण्याची शक्यता💥 

✍️ मोहन चौकेकर

केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह व 'शिवसेना' हे पक्षाचे नाव 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाला म्हणजेच एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. उद्धव  ठाकरे गटाला मिळालेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे गट  आणि एकनाथ शिंदे गटामध्ये निकाल आपल्या बाजूने राहावा यासाठी प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. आता उद्धव ठाकरे गटाचे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव एकनाथ शिंदे गटाला मिळाल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगातील लढाईत एकनाथ शिंदे गटाविरुद्ध  उद्धव ठाकरे गटाचा पराभव झाला आहे. त्यांच्या हातून आता पक्षाचे 'शिवसेना' या नावासह 'धनुष्यबाण' हे चिन्ह देखील एकनाथ शिंदे गटाला गेले आहे. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी 40 आमदारांसह वेगळे होत 'आम्हीच खरी शिवसेना' असल्याचं सांगितलं होतं. यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली, पण आता निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार  म्हटलं तर एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे गटातील शिवसेना पक्ष व धनुष्य बाण पक्षचिन्हाबाबतचा वाद आज या निवडणुक आयोगामध्ये  संपला आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे परंतु आजच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचा रखडलेला मंत्रीमंडळात विस्तार व मुंबई महापालिकेसह राहीलेल्या अन्य महानगरपालिकेच्या निवडणुका सह  संपूर्ण महाराष्ट्राच्या रखडलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता लवकरच घोषित होतील असे  वाटते आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या