💥जिंतूर सा.बां.विभाग कुंभकर्णी झोपेत : १० वर्षाचा कालावधी उलटल्या नंतरही तलाठी सज्जासह निवासस्थानाचे हस्तांतर नाही....!


💥सदर वास्तू पूर्ण करून तहसील कार्यालयाच्या ताब्यात न दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे💥

जिंतूर (दि.०१ जानेवारी) - महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून देऊन जिंतूरच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभागीय  अभियंत्यांना जिंतूर तालुक्यातील १० तलाठी सज्जा व त्यांचे निवासस्थान बांधकाम करण्यासाठी निधी देऊनही अद्याप पर्यंत हे बांधकाम पूर्ण करून त्यांचे हस्तांतर अद्यापही तहसील कार्यालयाला केले नसल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील दहा गावात तलाठी सज्जा व तलाठ्यांच्या निवासस्थानाची बांधकाम करण्यासाठी सुमारे १५ लक्ष रुपयाचा निधी शासनाने २०११/१२ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याला १५ लक्ष २७ हजार ९९३ रुपये वितरीत केला परंतु अद्याप पावतो सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर वास्तू पूर्ण करून तहसील कार्यालयाच्या ताब्यात न दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे गेल्या दहा वर्षापासून तालुक्यातील जोगवाडा वरुड नरसिंह कावी वझर केहार इटोली अंबरवाडी या गावांना तलाठी कार्यालय व निवासस्थान हे बांधकाम करण्यासाठी निधी देऊनही याचे बांधकाम पूर्ण झाले की नाही याचाही स्थान पत्ता सार्वजनिक बांधकाम खात्याला दिसून येत नाही यामुळे आता हे कधी हस्तांतर करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या