💥जिंतूर तालुक्यातील जांब (बु) येथील राजेश चक्कर पाटील यांना पितृ शोक...!


💥तातेराव मारोतराव चक्कर पाटील यांचे वयाच्या 65 व्या वर्षी दुःखद निधन💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील जांब (बु) येथील कै.तातेराव मारोतराव चक्कर पाटील वय 65 यांना दिनांक 9 फेब्रुवारी च्या रात्री पहाटे 02 वाजता अचानक हृदयविकाराने निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार दि.10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10-30 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात करण्यात आला त्यांचा तिसऱ्या दिवसांचा सावडण्याचा विधी रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 09-00 वाजता ठेवण्यात आलेला आहे

त्यांच्या अंत्यविधीस परिसरातील व बाळासाहेबांची शिवसेनाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सरपंच,उपसरपंच उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना जिंतूर येथील नेत्या सौ.अक्षताताई राजेश चक्कर पाटील यांचे ते सासरे होत. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, मुले,मुली, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या