💥समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते धर्मापुरी येथे रमाई घरकुलांचे वाटप...!


💥समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांची उपस्थिती💥


परभणी (दि.14 फेब्रुवारी) : धर्मापुरी येथे रमाई घरकुल आवास योजने अंतर्गत बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचा गृहप्रवेश आणि नवीन घरकुलाच्या प्रारंभाचा कार्यक्रम नुकताच राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते पार पडला.


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, सहाय्यक समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे, परभणी पंचायत समितीचे शिवाजी कांबळे, जिल्हास्तरीय शाखा अभियंता श्री. वसेकर उपस्थित होते रमाई आवास योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना राज्य शासनाकडून घरे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना या घरकुल योजनेअंतर्गत  घरे उपलब्ध करून देण्याचे सरकारने उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नागरिकांना रमाई आवास योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.


रमाई आवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे राज्यातील गरीब लोकांना स्वतःचे घर मिळवून देणे. जे आर्थिक दुर्बलतेमुळे स्वतःचे घर बांधू शकत नाहीत. रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील गरीब लोकांना घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती बौद्ध आणि आर्थिकदृष्ट्या घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील नागरिकांना देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  घरकुल गृहप्रवेश आणि बांधकाम कार्यक्रमाला नारायण शिंदे, तालुकास्तरीय श्री. सादिक, श्री. बोबडे, ग्रामविकास अधिकारी श्री. दुधाटे,यांच्यासह सरपंच गावातील नागरिक आदींची उपस्थिती होती....

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या