💥पुर्णेत इलेक्ट्रिक शेड व्हावे याकरिता आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक संपन्न....!


💥या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ आरोग्यतज्ञ डॉ.दत्तात्रय वाघमारे हे होते💥 


पुर्णा :- पुर्णेत प्रस्तावित रेल्वे इलेक्ट्रिक शेड रेल्वे विभागाने नांदेडला स्थलांतरित केल्याचे पत्रक काढल्यामुळे त्याला स्थगिती मिळावी व ते इलेक्ट्रिक शेड पुर्णेतच व्हावे यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज गुरुवार दि.०२ फेब्रुवारी २०२३ रोजी पुर्णेत एक प्राथमिक बैठक घेण्यात आली. 

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ आरोग्यतज्ञ डॉ.दत्तात्रय वाघमारे हे होते तर बैठकीला उपस्थित मान्यवरांमध्ये डॉक्टर्स असोसिएशन प्रमुख डॉ. गुलाबराव इंगोले, सना विद्यालय व महाविद्यालयाचे अध्यक्ष अब्दुल मुजीब, किराणा व्यापारी नफीस अबुबकर, सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी,शिक्षक रौफ कुरेशी,जनजागृती सेनेचे अध्यक्ष अनिल नरवाडे,वंचीत बहुजन आघाडीचे श्यामसुंदर काळे, सामाजिक कार्यकर्ते नागेश एंगडे,सरान बागवान,रौफ बागवान, काँग्रेस सोशल मीडिया शहर अध्यक्ष शेख सिराज,रेल्वे प्रवासी संघटनेचे युसुफखान अहेमद खान,सामाजिक कार्यकर्ते सय्यद अतिक, डि.वाय.एफ आयचे तालुकाअध्यक्ष सचिन नरनवरे, तालुका सचिव अमन जोंधळे, शहर उपाध्यक्ष राज जोंधळे व इतर सदस्य, पत्रकार मारोतराव ढाले, याशिवाय विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी व शहरातील सुजाण नागरिक उपस्थित होते. 

     या बैठकीत काही मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मत व्यक्त केले. या बैठकीत एक पूर्णा संघर्ष समिती स्थापन करावी व या एकजुटीला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी आपापले मतभेद दूर सारून शहराच्या विकासासाठी सर्वानी एकत्र यावे,येत्या 2 दिवसांत आणखी एक बैठक घ्यावी व पुढील दिशा ठरवावी अशा प्रकारची चर्चा करण्यात आली. 

बैठकीचे आयोजन डी वाय एफ आय पुर्णाकडून करण्यात आले तर डी वाय एफ आय चे जिल्हासचिव नसीर शेख यांनी सूत्रसंचालन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या