💥पुर्णा शहरातील शिवतिर्थ परिसरात उध्दव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध.....!

💥ठाकरे गटाच्या पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी बोंबा मारत....निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणा देत केला जाहीर निषेध💥

पुर्णा (दि.१८ फेब्रुवारी) - शिवसेना नावासह पक्षाची निवडणूक निशाणी धनुष्यबाण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्याबद्दल आज शनिवार दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी १२-०० वाजेच्या सुमारास शहरातील 'शिवतिर्थ' छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शहरप्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येवून ठाकरे गटाच्या पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करीत निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करीत निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध केला.

 या बोंबाबोंब आदोलना वेळी ठाकरे गटाचे मा.नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे. मा.नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा मा.नगरसेवक साहेब कदम माजी शहरप्रमुख बंटी कदम,नगरसेवक ॲड.राजेश भालेराव. शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम युवा तालुकाप्रमुख बंडू आप्पा बनसोडे.श्याम कदम.माणिकराव मोरे विकास वैजवाडे. प्रतिक्ष सवनेकर काशिनाथ कदम राजकुमार कदम  कुंडलिक मोरे तातेराव चव्हाण बालासाहेब कदम नागोराव मोहिते ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या