🌟साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये....!

 


🌟या योजनेंतर्गंत एकूण १४८ कर्ज मागणी अर्ज प्राप्त : लाभार्थी निवड चिठ्यांद्वारे करणार🌟

परभणी (दि.२८ फेब्रुवारी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये थेट कर्ज योजनेंतर्गंत २८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२२ या दरम्यान कर्जाची मागणी अर्ज स्विकारण्यात आले आहेत. या योजनेंतर्गंत एकूण १४८ कर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १४० कर्ज मागणी अर्ज पात्र व ८ अपात्र ठरले आहेत.

पात्र कर्ज मागणी अर्जापैकी  ९६ पुरुष व ४४ महिला आहे. या योजनेचे ४० कर्ज प्रकरणाचे उदिष्ट असुन त्यापैकी २० पुरुष व २० महिला कर्ज मागणी अर्जाची लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मान्यतेनुसार चिठ्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) निवड करावयाची आहे. त्यासाठी दि. १० मार्च सकाळी  ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात श्री. वडदकर यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड चिठ्ठीद्वारे (लॉटरी पध्दतीने) होणार आहे.  पात्र अर्जदारांची यादी महामंडळाच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे, याची संबधितांनी नोंद घ्यावी. तसेच त्यामुळे जिल्ह्यातील अर्जदारांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सि. के. साठे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या